आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार धवल क्रांतीचे जनक ,कृषी विद्यापीठाचे जनक , मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देणारे, सर्वाधिक कार्य कार्यकाल मुख्यमंत्री पद भूषविणारे ,पंचायत राज योजनेचे महानायक हाबुजी उर्फ वसंतरावजी नाईक यांची जयंती रेस्ट हाऊस आर्वी येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
या समय काही वरिष्ठ मंडळी आपले मनोगत ही व्यक्त केले त्यात माननीय राठोड सर यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत सांगितले की नाईक साहेबांना आम्ही जवळून बघितले आहे. त्यांच्या पार्थिवाला आम्ही स्पर्शही केला आहे . आपल्या धर्मपत्नी वत्सलाबाई नाईक यांनी एका ठिकाणी असे लिहून ठेवले आहे की मी नाईक साहेब यांना पूजा-अर्चा करताना कधीच बघीतलेच नाही ते पूजा करायचे माणसाची आणि माणूस हा त्यांचा विकासाचा केंद्रबिंदू होता परंतु नाईक साहेब तमाम बहुजन आज पूजा-अर्चा होम-हवन सत्यनारायण पूजा, कर्मकांड व पूजा आरती मध्ये किंवा संकष्टी चतुर्थी ,पौर्णिमा एकादशी, अमावस्या या व अशा धार्मिक कर्मकांड यामध्ये गुंतलेले आहे आपण तर कधी पूजा केली परंतु सेवालाल महाराजांनी सुद्धा भजन पूजन यांना फाटा दिला होता. ज्याप्रमाणे सेवालाल महाराजांनी उजमत चा नारा दिला होता तसाच नारा वसंतराव नाईक यांनी सुद्धा दिला होता. आपला हा बहुजन बांधव पूजा-अर्चा होम-हवना कडे फार मोठ्या प्रमाणात वेळ व पैसा खर्च करताना दिसतो आहे. एवढा मोठा अधिकारी तेवढा तो पोथी वाचक हरामाचे मिळालेले पैसे तो समाज कार्य करणाऱ्या व्यक्तींना देणार नाही. परंतु इतर कामांमध्ये तो खर्च करणार अमाप संपत्ती असूनही तो पोहरादेवी येथे जाऊन नतमस्तक होण्यासाठी त्याला लाज वाटणार पण मुंबईत एका मंदिरात तासन्तास ताटकळत दर्शन घेणार असे आमचे शिक्षित बांधव आहे.
चार पुस्तकं शिकलेल्या आमच्या भगिनी शहरात आल्यावर मार्गशीष महिना, नवरात्र संकट चतुर्थी , वैभव लक्ष्मी व्रत याकडे वळल्या आहे . आठवड्यातले चार दिवस उपास करून शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. यांचा विचार आपण जरूर करावा अशी आपणास विनंती आहे . असे ते म्हणाले.
यानंतर महेश देवशोध यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षणाचे महत्त्व काय आहे याविषयी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की वसंतराव नाईकांनी जे सांगितले ते महात्मा फुले यांनी सांगितले बाबासाहेब आंबेडकर यांनीही सांगितले आणि वसंतराव नाईक यांनीही सांगितले पण आपण त्यांचे म्हणणे आजही लक्षात घेत नाही .शिक्षण नोकरीसाठी नाही तर शिक्षणाने मनुष्य चिकित्सक बनतो त्याला विचार करता येतो, स्वतःच्या बुद्धीचा वापर करता येतो. महात्मा फुले यांनी सांगितलेल्या विचार असा आहे. ज्यात त्यांनी विद्या विना मती गेली,गती गेली, वित्त गेले, एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले हीच परिस्थिती आजही बहुअंशी दिसत आहे याचं दुःख आम्हाला वाटते . म्हणूनच लोकांचे ऐकून आपल्या बुद्धीप्रमाणेच करावे असे त्यांनी मनोगतात सांगितले.
दशरथ भाऊ जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपल्या आपल्या आजूबाजूने तसेच काही तलावाचे खोदकाम माननीय वसंतरावजी नाईक यांच्या विचाराप्रमाणे झाले. अप्पर वर्धा प्रकल्प ही नाईक साहेबांची देण आहे .असे त्यांनी सांगितले .पाणी अडवा व पाणी जिरवा या संकल्पनेला आकार देऊन पूर्णत्वास नेणारे माननीय नाईक साहेबच आहे. शेती व शेतकरी यांचा रात्रंदिवस विचार करून त्यांचा विकास कसा करता येईल त्यांचे राहणीमान कसे उंचावता येईल याचाच त्यांना सदोदीत ध्यास होता म्हणूनच त्यांनी धरणाचे पाणी कालव्यात आणि कालव्यातून शेतकऱ्याच्या शेती पर्यंत पाणी आणण्याचा प्रयत्न केला हि कल्पना ही वसंतराव नाईक साहेबांचीच आहे .असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
यात एक दुग्धशर्करा योग म्हणजे माननीय वसंतरावजी नाईक साहेबांची जयंती व गोर बंजारा विचार मंचचा एक सदस्य मा. पी. के. जाधव सर यांचा वाढदिवस त्याच कार्यक्रमात केक कापून सर्वांनी सरांना केक चारून व हार्दिक शुभेच्छा देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पिके सर यांनी सर्वांचे आभार मानले कारण आश्चर्यचकित करणारी घटना होती . अचानकपणे कार्यक्रम त्यांच्यासाठी करण्यात आला त्यामुळे ते गहिवरून आल्यासारखे वाटले. खरंच अचानकपणे असे काही घडते ना तेव्हा आश्चर्य नक्कीच वाटत असते. तसे पिके सरांचेही झाले असेल यात शंका नाही———–
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वच मंडळींनी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
पोलिस योद्धा वृत्तसेवा
प्रफुल्ल भुयार
आर्वी तालुका प्रतिनिधी
90 49 18 47 22