आधार लिंक न झाल्यास सिधा पत्रिका रद्द केल्या जाणार- निरीक्षण अधिकारी
तालुका वार्ताहर कामठी ….:-कामठी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातील ई पॉस उपकरणामधील शपथ पत्राद्वारे आधार सीडिंग व मोबाईल सीडिंग सुविधेचा अधिकतम वापर करून आधार व मोबाईल क्रमांक सिडिंगचे प्रमाण वाढविण्यात येत आहे.31 जानेवारी पूर्वी प्रत्येक शिधापत्रिकेत लाभार्थ्यांचे 100 टक्के आधार सीडिंग व एक वैध मोबाईल क्रमांक सीडिंग करण्याच्या उद्देशाने तहसिलदार अरविंद हिंगे यांच्या आदेशान्वये
कामठी तालुक्यात मोहीम राबविण्यात येत असून जानेवारी 2021 चे धान्याचे वाटप करतेवेळी ई पॉस उपकरणाद्वारे स्वस्त धान्य दुकानदारा मार्फत कुटुंबातील सदस्यांचा आधार सीडिंग नसल्यास अशा सदस्यांनी आपल्या नजीकच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन
आधार व मोबाईल क्रमांकाचे सीडिंग पूर्ण करून घ्यावे तर 31 जानेवारी पर्यंत आधार सीडिंग न झालेल्या लाभार्थ्यांचे अनुद्येय धान्य पुढील महिन्यापासून आधार सीडिंग होईपर्यंत निलंबित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे आव्हान कामठीचे निरीक्षण अधिकारी संदीप शिंदे यांनी आज कामठो तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत व्यक्त केले.
.लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित न राहावे यासाठी यासाठी 31 जानेवारी पूर्वी आधार क्रमांक , मोबाईल क्रमांक सीडिंग 100 टक्के करण्याचे आव्हान त्यांनी केले तसेच या शिधापत्रिकावर मागील तीन महिन्यापासून धान्य न उचलनाऱ्या अशा सर्व शिधापत्रिका तपासनीअंती तात्पुरती निलंबित करण्यात येईल किंवा धान्य अनुदान नसलेल्या योजनेत वर्ग करण्यात येणार असल्याचे सुदधा सांगितले यावेळी कामठी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार प्रामुख्याने उपस्थित होते.
Box:-सलग तीन महिने धान्य न उचलणाऱ्या सर्व शिधापत्रिका जानेवारी 2021 नंतर चौकशीअंती कायमस
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535