महाराष्ट्र

आढावा! सोलापूर जिल्ह्यात स्थानिक आघाड्यांची सरशी

Summary

आवताडेंची पॉवर, मंगळवेढ्यात अनेकांना धक्का देत तब्बल ‘इतक्या’ ग्रामपंचायतींमध्ये दणदणीत विजय सोलापूर जिल्ह्यातील 587 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये बहुतांश ठिकाणी स्थानिक आघाड्यांनीच बाजी मारली. अनेक ग्रा.पं. मध्ये सत्तांत्तर होऊन तरुणांकडे सत्तेच्या चाव्या गेल्या आहेत. सोमवारी लागलेल्या निकालानुसार माळशिरस तालुक्यात भाजपच्या मोहिते-पाटील गटाने […]

आवताडेंची पॉवर, मंगळवेढ्यात अनेकांना धक्का देत तब्बल ‘इतक्या’ ग्रामपंचायतींमध्ये दणदणीत विजय

सोलापूर जिल्ह्यातील 587 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये बहुतांश ठिकाणी स्थानिक आघाड्यांनीच बाजी मारली. अनेक ग्रा.पं. मध्ये सत्तांत्तर होऊन तरुणांकडे सत्तेच्या चाव्या गेल्या आहेत.

सोमवारी लागलेल्या निकालानुसार माळशिरस तालुक्यात भाजपच्या मोहिते-पाटील गटाने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. पंढरपूर तालुक्यात आ. परिचारक गटाने मुसंडी मारली असून मंगळवेढात आवताडे गटाने बाजी मारली आहे.

भालके गटानेही आपल्याकडील काही ग्रामपंचायती कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. अक्कलकोट तालुक्यात भाजप आणि काँग्रेसनेही आपलेच वर्चस्व असल्याचा दावा केला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर समाधान आवताडे गटाने वर्चस्व स्थापन केले आहे. माचणूरमध्ये भालके गटाकडे असणारी सत्ता आवताडे गटाने हिसकावून घेतली आहे. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर आवताडे गटाचा झेंडा फडकला आहे.

माढा तालुक्यात राष्ट्रवादी, उत्तर सोलापूर तालुक्यात शिवसेनेने ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखले आहे.जिल्ह्यातील 587 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 940 ग्रामपंचायत सदस्यांसाठीची मतमोजणी विविध ठिकाणी पार पडली.

सकाळी 8.30 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. नऊ वाजण्याच्या सुमारास निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली. निवडून आलेल्या पॅनेलचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष करुन आनंदोत्सव साजरा करत होते.

दरम्यान, अनेक ठिकाणी मतदारांनी सत्ताधार्‍यांविरोधात कौल देत मातब्बर राजकारण्यांना जनतेने मतदान यंत्रातून धक्के दिले आहेत. अनेक ठिकाणी नवख्या उमेदवारांच्या हाती ग्रामपंचायतीचा कारभार सोपविला आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील पारंपरिक बळीरामकाका साठे आणि माजी आ. दिलीप माने यांच्या गटात निवडणुका पार पडल्या असल्या तरी यामध्ये भाजपनेही मोठी मुसंडी मारली आहे.

वडाळा ग्रामपंचायतीवर साठे गटाने आपले पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये कोंडी, गुळवंची येथे शिवसेनेने बाजी मारली, तर कोंडी, भोगाव, बाणेगाव येथे सत्ताधार्‍यांना हादरा बसला आहे.

होनसळ, राळेरास, सेवालालनगर याठिकाणीही सत्तांतर झाले आहे. कळमण, बीबीदारफळ येथे सत्ताधार्‍यांना काहीअंशी धक्का बसला आहे.

मोहोळ तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर माजी आ. राजन पाटील गटाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकला आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायतीवर बाराचारे पाटील गटाने 17 पैकी 13 जागा मिळवल्या आहेत. उर्वरित तालुक्यांतील अनेक ग्रामपंचायतींवर भाजप आणि काँग्रेसने वर्चस्व मिळविले आहे.

होटगी ग्रामपंचायतीवर भाजपने रामप्पा चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता मिळविली आहे.

सांगोला तालुक्यात अनेक ठिकाणी सत्ता परिवर्तन झाले असून शेकापने सर्वात जास्त ग्रामपंचायतींवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या पॅनेलचा दारूण पराभव झाला आहे. जवळा ग्रामपंचायतींवर साळुंखे-पाटील गटाने 15 पैकी 11 जागा मिळविल्या आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

अक्कलकोट तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर माजी आ. सिध्दाराम म्हेत्रे गटाने वर्चस्व प्रस्थापित केल्याचा दावा केला आहे, तर भाजपचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांनीही भाजपकडेच सर्वाधिक ग्रामपंचायती असल्याचा पत्रकार परिषद घेऊन दावा केला आहे.

अनेक ठिकाणी आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या गटाला पराभव स्वीकारावा लागला आहे.

माढा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर आ. संजयमामा शिंदे यांच्या गटाने वर्चस्व मिळविले आहे. काही ठिकाणी आ. बबनदादा शिंदे यांच्या गटाकडे सत्तांतर झाले आहे.

काही ठिकाणी स्थानिक आघाडी आणि युवकांनी सत्तांतर करुन पारंपरिक गटांना बाजूला ठेवत ग्रामपंचायतीची सत्ता स्थापन केली आहे.

पंढरपूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींवर स्थानिक नेत्यांचा प्रभाव दिसून आला आहे. काही ठिकाणी परिचारक गट, काही ठिकाणी कल्याणराव काळे गट, तर काही ठिकाणी माजी आ. स्व. भारत भालके यांच्या गटाकडे ग्रामपंचायतीची सूत्रे गेली आहेत.

मोहिते-पाटील यांच्या पुतण्याचा पराभव

अकलूज ग्रामपंचायतीमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे तथा जयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव झाला असून त्यांना धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या गटाचे गिरीराज माने-देशमुख यांनी पराभूत केले. त्यामुळे ‘गड आला, पण सिंह पडला’, अशी स्थिती अकलूज ग्रामपंचायतीमध्ये झाली

सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा ) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *