आठवडी बाजार नियम व शर्ती नुसार सुरू राहतील :- जिल्हाधिकारी संदीप कदम
………. कोवीड – 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासुन लागु करून खंड 2,3,व 4 नुसार अधीसुचना देण्यात आल्या.
…………. कोवीड – 19 संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढु नये व सोसियल डिस्टेंसींग राखण्यासाठी शासन आदेशानुसार भंडारा जिल्ह्य़ातील अत्यावश्यक सेवा व इतर पत्रानुसार विविध प्रकारचे प्रतिबंध लावले होते.
………… त्या अनुषंगाने प्रपत्रानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद भंडारा यांनी जिल्हा परिषद मालकीचे आठवडी बाजार सुरू करण्याचे विनंती पत्र कार्यालयात सादर होते. लाकडाउन पासुन आठवडी बैठक बाजार बंद करण्यात आले होते. त्यामुळे बाजार ठेकेदार व लहान जसे सब्जी भाजी, फळ विक्रेते, छोटे मनेरीवाले यांचे नुकसान होत होते.
……… त्यानुसार जिल्हा परिषद च्या सर्वसाधारण सभेत चर्चा होवुन आठवडी बाजार सुरू करण्याची मंजुरी प्रदान करण्यात आली. व हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आला.
………… त्याअनुसंगाने नियम व शर्ती च्या अधिन राहुन अखेर 13/10/2020 पासुन अमल करण्यात आला.
………… मुख्य कार्यकारी अधिकारी जी. प. भंडारा भुवनेश्वरी मॅडम SOPची अंमलबजावणी करून जिल्हाधिकारी कार्यालयात अहवाल सादर करतील.
………..ग्रामपंचायत किंवा इतर कोणत्याही व्यक्ती आदेशाचे पालन न केल्यास कलम 188 व आपत्ती व्यवस्थापक कायदा 2005 चे कलम 51,55व 56नुसार कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
………. तहसीलदार व विस्तार अधिकारी यांच्या देखरेखीखाली कारवाई होईल.
राजेश उके
न्युज रिपोर्टर
तुमसर तालुका
जिल्हा भंडारा
9765928259