अपघाताच्या चौकशीत कंपनी दोषी आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल – कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश कडू
Summary
वर्धा,दि 6 जिमाका ) कंपनी व्यवस्थापनांनी अपघाताची चौकशी करुन व्यवस्थापक चौकशीत दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा शासनाच्या वतीने चौकशी अहवालात अपघातास कंपनी दोषी आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागांनी कारखान्याचा परिक्षण अहवाल तयार […]
वर्धा,दि 6 जिमाका ) कंपनी व्यवस्थापनांनी अपघाताची चौकशी करुन व्यवस्थापक चौकशीत दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा शासनाच्या वतीने चौकशी अहवालात अपघातास कंपनी दोषी आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागांनी कारखान्याचा परिक्षण अहवाल तयार करावा. अशा सुचना कामगार, जलसंपदा लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश कडू यांनी कारखान्यातील अपघात स्थळाला भेट देतांना औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या उपसंचालकांना केल्या.
3 फेब्रुवारीला उत्तम गलवा येथील फरनेस मधील गरम हवा व राख अंगावर येऊन झालेल्या अपघात स्थळाची पाहणी केली. यावेळी कंपनीचे व्यवस्थापक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या उपसंचालक पल्लवी गोंपावार, उत्तम गलवा कंपनीचे जनसंपर्क अधिकारी आर.के. शर्मा उपस्थित होते.
श्री.कडू यांनी श्रीमती गोंपावार यांना कंपनी सुरक्षा विषयक तात्काळ परिक्षण अहवाल तयार करावा त्यासोबतच कंपनीमध्ये किती धोकादायक युनिट आहे तसेच त्यामध्ये किती कामगार कार्यरत असतात याची नोद संबधित युनिटमध्ये असणे आवश्यक आहे. काम करणाऱ्या या कामगारांना कुठल्याही प्रकारचे सुरक्षा जॅकेट पुरविण्यात आलेले नाही, फरनेसची देखभाल करण्याकरीता फरनेस बंद केल्यावर कामगारांना पूर्व सुचना देणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा अहवाल तयार करुन तात्काळ शासनाला सादर करावा त्यासोबत अहवालाची प्रत पोलिस विभागांना द्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. कंपनीतील कामगारांना पोशाख पुरविण्यात यावे त्याचबरोबर सुरक्षा रक्षकाकडे असलेल्या लाकडी काठ्या बदलून फायबरच्या काठ्या सुरक्षा कंपनीने पुरवाव्यात, अशा सूचना श्री.कडू यांनी केल्या.
यावेळी श्री.कडू यांनी कंपनीतील अपघात स्थळाची पाहणी करुन कामगाराच्या समस्याही जाणून घेतल्या. तसेच कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम व सावंगी मेघे येथे अपघातात जखमी झालेल्या चार व आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी मेघे येथे दाखल असलेल्या आठ रुग्णाच्या प्रकृतीची चौकशी करुन औषधोपचार चांगला होत असल्याची खात्री केली. यावेळी सेवाग्राम येथील रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगने, मेडिसिन विभाग प्रमुख दिलीप गुप्ता सावंगी मेघे येथे प्रशासकिय अधिकारी अभ्युदय मेघे, डॉ. महाकाळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, उपस्थित होते.
संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491