अखेर एकनाथ खडसेंनी भाजप ला राम राम ठोकत शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाण्याचा मुहूर्त काढला.
मुम्बई वार्ता:- भाजप चे नेते एकनाथ खडसे यांनी आज पत्रकर परिषद घेतली. या पत्रकार परिषदेस खडसेंनी भाजप ला अखेर चा राम राम ठोकला आणि ते शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते म्हणून वाटचाल सुरू करणार आहेत.
पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. त्यांनी बोलताना असे ही सांगितले की माझे कुठल्या ही केंद्रातील भाजप नेत्यांशी वैर नाही माझे सर्वांशी चांगले संबंध आहेत. पण जेव्हा त्यांच्या वर देवेंद्र फडणवीस जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्याच्या वर चालवले जाणारे चुकीचे खटले आणि त्या खटल्यान दरम्यान त्यांच्या वर तब्बल ९ महिने पाळत ठेवण्यात आली. या सर्व प्रकारामुळे झालेला मनस्ताप आणि त्या मुळे झालेली बदनामी झाली.
गेल्या ४५ वर्षात गोपीनाथ मुंडे, प्रविण महाजन आणि माझे बरेच जुने एकनिष्ठ सहकारी मिळून महाराष्ट्रात भाजप ची मूळ रोवली. पक्षाची सर्व जबाबदारी एकनिष्ठ राहून पार पाडल्या. एवढ सर्व करून ही देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या वर चुकीचे खटले चालवले आणि आता मी भाजप च्या नेते पदावरून राजीनामा देत आहे आणि येत्या शुक्रवारी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये समावेश करत आहे.
साजन रमेश कांबळे
दक्षिण मुंबई प्रतिनिधी
8169048053