मृतक महेश जोशीच्या परिवाराला दहा हजारची आर्थिक मदत
भिलेवाडा पेट्रोल पंप भंडारा येथे दुचाकी मोटारसायकल व अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत पावलेल्या “महेश गुणेश्वर जोशी” राहणार ग्राम बिर्सी ता. आमगाव जि. गोंदिया यांच्या कुटुंबियाना आर्थिक मदत म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्री वाय टी कटरे माजी सभापति कृ उ बा समिती तिरोडा यांच्या कडुन 5000/-रु व एँड तिमांडे साहेब तुमसर यांच्याकडुन 5000/- ची आर्थिक मदत्त देण्यात आली यावेळी श्री वाय टी कटरे माजि सभापति एँड तिमांडे साहेब मॄतकाची आई मंतुराबाई जोशी, पत्नी शिशुकलाबाई जोशी भाऊ अमृत जोशी गटशिक्षण अधिकारी यादोराव भोयर,गावकरी मंडळी कन्हैयालाल पटले, हेमराज राऊत चंदाबाई बिसेन आशावर्कर,सिताबाई राऊत, हे उपस्थित होते