आष्टी गावात मुलीने विहरित उडी मारुन केली आत्महत्या!
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता*- पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार तुमसर तालुक्यातील आष्टी गावातील घटना आहे.
सविस्तर वृत्त असे की कु.यशस्वी महेद्र बोरकर गाव कवलेवाडा येथील रहिवासी असुन आपल्या मामा राजकुमार श्रीराम गौपाले गाव आष्टी मध्ये राहत होती.
मागील वर्षी बारावि ची परिक्षा जनता ज्युनिअर कॉलेज तुमसर येथे दिली.
घटना अशाप्रकारे घडली कि 25/06/021ला खुप रात्री उशिरापर्यंत घरचीTV बघीतली,
रात्री अंदाजे तिन वाजे दरम्यान आपल्या झोपलेल्या खाटेवरुन उठून मागच्या बाजूने जावुन शंभर फूट अंतरावर असलेली शिंचन विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली,व आपला मोबाईल फोन विहिरीच्या कठेवर ठेवला.
सकाळी मामा मामी जागे झाले तेव्हा त्यांना भाची खाटेवर दिसली नाही,मग घरामध्ये बोंबाबोंब झाली.
मुलीचा शोध घेत मामा मामी व त्यांचे नातेवाईक यांना शंभर फुटावरील अंतरावर असलेली सिंचन विहीरीच्या कडेवर असलेला मोबाईल ह्यांडसेट दिसला, त्यावरून त्यांच्या लक्षात आले की भाचीने विहरीत उडी मारली असावी!
घटनास्थळी पोलीस प्रशासन चे कर्मचारी व *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* चे सहकारी संपादक तथा विशेष पत्रकार *राजेश उके* व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सर्कल अध्यक्ष विलास गौपाले असतांना लाश बाहेर काढली.
पोलीस विभागातीलasi गोंडगे, शिपाई जाईभाई व महिला कर्मचारी समोर कलम 174 जा.फो करुन लाश पोस्टमार्टम करिता पाठविण्यात आली.