अभाविपच्या 73 व्या स्थापना दिनानिमित्त वरठी येथे वृक्षारोपण
स्वार्थी करमकर/महिला प्रतिनिधी
आज दिनांक 9 जुलै 2021 रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा 73 वा स्थापना दिवस अभावीप शाखा वरठी तर्फे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. पर्यावरण रक्षणाचा संदेश देत हनुमान वार्ड वरठी येथील प्राथमिक शाळा क्रमांक 2 येथे उंबर, जांभूळ, आंबा व कडूलिंबाचे वृक्षारोपण केेेले. त्यावेळी अभाविप वरठी शाखेचे नगरमंत्री रुपेश सपाटे यांच्यासह सोशल मीडिया प्रमुख कृष्णा भगत, पराग पाटील, सोमेश साठवणे, नयन हनवत, अमन ठाकरे हे अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर