भंडारा

अड्याळ येथे अज्ञात आरोपीने केली रात्री घरफोडी

Summary

प्रतिनिधी अड्याळ          प्रकरण अशा प्रकारे आहे की यातील फिर्यादी श्री रवींद्र लहानुजी मरघडे वय ५३ वर्ष राहणारा कोसरा दिनांक २८-०४-२०२३ चे १९ वाजे ते २९-०४-२०२३ चे 8:30 वाजता दरम्यान कोसरा दहा किमी दक्षिण येथे रिवायडींग ची […]

प्रतिनिधी अड्याळ
         प्रकरण अशा प्रकारे आहे की यातील फिर्यादी श्री रवींद्र लहानुजी मरघडे वय ५३ वर्ष राहणारा कोसरा दिनांक २८-०४-२०२३ चे १९ वाजे ते २९-०४-२०२३ चे 8:30 वाजता दरम्यान कोसरा दहा किमी दक्षिण येथे रिवायडींग ची दुकान मौजा कोसरा येथे असून यातील फिर्यादी याचे दुकानाचे शटर चे लॉक तोडून दुकानांमधील रॅक मध्ये ठेवलेले सफेद कोटिंग सबमर्सिबल रिवायडींग तांब्याचे तार १४५ किलो किंमत अंदाजे ७२,५००/- रुपये दुसरा मोनोब्लॉक रिवायडींग तांब्याचे तार ५० किलो अंदाजे किमती २० हजार रुपये जळालेल्या तांब्याचे तार ८० किलो अंदाजे किमती २४,००० रुपये असा एकूण १,१६,००० रुपयांचा माल कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरून नेला आहे. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन अड्याळ येथे अपराध क्रमांक ९६/२०२३ कलम ४५७, ३८० भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मिसाळे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *