BREAKING NEWS:
ब्रह्मपुरी

शिक्षकांकडून मुलाच्या अंत्यविधीस आर्थिक मदत

Summary

मयत गणेश विजू भानारकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र.5 ब्रम्हपुरी येथील वर्ग 3 ऱी मधील विध्यार्थी हा 1 जुलै 2021 रोजी खेळण्यासाठी फ़ॉरेस्ट ऑफिस समोरील गिट्टीखदान येथील खड्ड्यात पडून मृत्यू पावला. त्याची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची असल्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक श्रीमती […]

मयत गणेश विजू भानारकर

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र.5 ब्रम्हपुरी येथील वर्ग 3 ऱी मधील विध्यार्थी हा 1 जुलै 2021 रोजी खेळण्यासाठी फ़ॉरेस्ट ऑफिस समोरील गिट्टीखदान येथील खड्ड्यात पडून मृत्यू पावला. त्याची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची असल्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक श्रीमती रेखा रामटेके, रामभाऊ पिलारे व जयदास सांगोडे सहाय्यक शिक्षक यांनी शाळेकडून दोन हजार रुपये अंत्यविधीस सामाजिक बांधिलकी म्हणून आर्थिक मदत दिले. या प्रसंगी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अनिल चिलमवार, भागशिक्षणाधिकारी विद्या शेळके, केंद्रप्रमुख सुरेंद्रसिंह बैस, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अल्का बनपुर कर या उपस्थित होत्या. गटशिक्षणाधिकारी अनिल चिलमवार यांनी राजीव गांधी विमा योजनेअंतर्गत 70.000 रुपये विमा प्रस्ताव बनवून जिल्हा परिषद
कडे सादर करण्यात येईल असे सांगितले.

मृत विदयार्थ्यांच्या कुटुंबीयांना नगरसेवक डाँ. नितीन उराडे यांचेकडून आर्थिक मदत

ब्रम्हपुरी/
ब्रम्हपुरी शहरातील गांधीनगर येथील गणेश विजु भानारकर (वय ९ वर्ष ) ह्या मुलाचा ब्रम्हपुरी शहरानजीकच्या वनविभाग कार्यालयाच्या समोरील गिट्टीखदानच्या खड्ड्यात पडुन १ जूलै ला मृत्यू झाला.
सदर मुलाचे आईवडील हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे सदर वार्डाचे नगरसेवक डॉ. नितीन उराडे यांना कळताच त्यांनी सदर कुटुंबियांना आपल्या कडून आर्थिक मदत पाठवली. व चंद्रपूर जिल्हा परिषदेकडे राजीव गांधी अपघात विमा योजनेतंर्गत अर्थसहाय्यासाठी तात्काळ प्रस्ताव पाठवावे अशी सूचना संबंधितांना दिली.
सोबतच आपण सदैव सदर कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे यावेळी डॉ. नितीन उराडे यांनी सांगितले.
सदर आर्थिक मदत देतांना राहुल सातपुते, जयदास सांगोडे, पत्रकार राहुल मैंद व अन्य नागरिक उपस्थित होते.
—————————————-
*जि.प. शाळेतील शिक्षकांनी दाखविली माणुसकी*
गांधीनगर येथे जिल्हा परिषदेची क्र. ५ ची शाळा आहे. सदर शाळेत ३ ऱ्या वर्गात मृतक विद्यार्थी हा शिकत होता.
त्याच्या घरची आर्थिक परीस्थिती हलाखीची असल्याने सदर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेखा रामटेके, रामभाऊ पिलारे, जयदास सांगोडे या शिक्षकांनी सुध्दा सदर कुटुंबियांना आर्थिक मदत केली.
या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी अनिल चिलमावर, शिक्षण विस्तार विस्तार अधिकारी विद्या शेळके,केंद्र प्रमुख सुरेंद्र बैस हे उपस्थित होते

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *