पुणे

पुण्यात या वर्षी देखील गणेश उत्सव साधेपणाने साजरा करावा लागणार…

Summary

पत्रकार – सागर घोडके पुणे मावळ            राज्यातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा असे पुणे पोलीसांनी म्हणले आहे. गणेशोत्सव साजरा करताना होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील […]

पत्रकार – सागर घोडके
पुणे मावळ

           राज्यातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा असे पुणे पोलीसांनी म्हणले आहे. गणेशोत्सव साजरा करताना होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील सण हे साधेपणाने साजरा करण्याचे आव्हान केले आहे. दहीहंडी हि साधेपणाने साजरी करण्यात आली. त्यानंतर आता गणेशोत्सव हि साधेपणाने साजरा करण्यासाठी पुणे पोलिसांनी नियमावली तयार केली आहे. त्यामुळे ह्या वर्षी ही गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार आहे.
पुणे पोलिसांनी ठरवून दिलेली नियमावली पुढील प्रमाणे –
1) गणेश मूर्तीच्या सार्वजनिक मिरवणूकीस बंदी घालण्यात आली.
2) बाप्पा चे विर्सजण होता वेळेची गर्दी लक्षात घेता या वेळी विसर्जन साध्या पद्धतीने करण्यात यावे.
3) गणेश मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यापेक्षा शिबीर व करोना जनजागृती कार्यक्रम आयोजित करावे.
4) हे करताना करोना प्रभाव वाढता कामा नये.
याची सर्वानी दक्षता घ्यावी असे पोलीस म्हणाले.
होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने पाऊले उचलेले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुणे पोलीस खास तयारी करत आहेत.
पोलिसांनी गणेश मूर्ती व्यापारी व कारागीर यांच्याशी समन्वयाची भुमिका घेतली आहे.
पुणे पोलिसांच्या नियमांनुसार गणेश मूर्ती, देखावे, मंडळांची भुमिका, नियोजन, विसर्जन, गर्दी चे सर्व नियोजनांवर यांवर पोलिसांकडून लक्ष राहणार आहे.
या मुळे सर्व नियमावली लक्षात घेता गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *