पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात आढळून आला ब्रिटिश कालीन बॉम्ब पिंपरी चिंचवड मधिल कोहिनूर इमारतीच्या परिसरात खोदकाम सुरू असताना एक ब्रिटिश कालीन बॉम्ब सापडला आहे.
पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात आढळून आला ब्रिटिश कालीन बॉम्ब
पिंपरी चिंचवड मधिल कोहिनूर इमारतीच्या परिसरात खोदकाम सुरू असताना एक ब्रिटिश कालीन बॉम्ब सापडला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस घटना स्थळी दाखल झाली आहे. हा बॉम्ब जिवंत आहे की नाही याचा शोध बॉम्ब पथक घेत आहेत.
आज सकाळी १० ते १२ च्या सुमारास पिंपरी मधिल कोहिनूर इमारतीच्या आवारात खोदकाम सुरू असताना जेसीबी चालकाला हा बॉम्ब आढळून आला. यानंतर याची माहिती पिंपरी पोलीसांना मिळताच पोलीस या ठिकाणी पोहचले. तो पर्यंत पुण्याहून बॉम्ब नाशक पथक निघाले होते. हे पथक घटना स्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी बॉम्ब परिसरातील पाहणी करत तो बॉम्ब सील करून तपासणी साठी घेऊन गेले.
बॉम्ब नाशक पथकाने बॉम्ब तपासणी साठी घेवून जाता वेळी तो जेसीबीच्या बकेट मध्ये वेळूची पोती टाकून त्यात बॉम्ब सद्रुश वस्तूत ठेवून बॉम्ब तपासणीसाठी नेण्यात आला. पिंपरी परिसरातील यापूर्वी देखील असे ब्रिटिश कालीन बॉम्ब आढळून आले आहेत. हे बॉम्ब अनेक वर्षांपासून जमिनीवर पडलेले असून ते खोदकामाच्या वेळी आढळून येत आहेत.
पुणे (पिंपरी – चिंचवड)
पञकार – सागर घोडके