पुणे लोणावळा प्रवाशांना आनंदाची बातमी लोणावळा – पुणे लोकलच्या फेरीत वाढ
पत्रकार – सागर घोडके
पुणे मावळ
लोणावळा – लोणावळा पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या करता आनंदाची बातमी, कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता रेल्वेच्या फेरी कमी करण्यात आल्या होत्या. या दरम्यान शासकीय कामगार व कर्मचारी यांसाठी विशेष लोकल सोडण्यात आल्या होत्या.
मागील पंधरा दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस झालेल्या नागरीकांना विषेश लोकल मधुन प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील वाढत्या लसीकरणानंतर लोकल प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. या बाबी लक्षात घेऊन रेल्वेचे पुणे विभागाचे AOM संजय
कुमार यांनी या वाढीव फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
यादरम्यान लोणावळा पुणे लोकलच्या फेरीत वाढ करण्याच्या मागण्या जोर धरू लागल्या होत्या.
या मागणीचा विचार केला असता रेल्वे विभागाने लोकल फेरीत वाढ केली आहे.
नविन वेळापत्रकानुसार लोकल रेल्वेच्या फेरीत १ सप्टेंबर पासून फेरीत वाढ होईल लोकल रेल्वेचे वेळापत्रक खालील प्रमाणे..
– डाऊन मार्गावर लोणावळ्याहून पुण्यासाठी सकाळी ६.३० वा, सकाळी ८.२०मि., सकाळी १०.०५ मि. व सायंकाळी ६.२० मि. आणि सायंकाळी ७.३० वा. लोकल सुटेल.
– अप मार्गावर पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ६.३० मि, सकाळी ८.०५ मि, सांयकाळी ४.२५ मि, सायंकाळी ६.०२ मि. व रात्री ८.००वाजता लोकलगाड्या सुटतिल