पवनानगर येथील नाकाबंदी मुळे सापडला अट्टल दुचाकी चोर
पत्रकार – सागर घोडके
पुणे (मावळ)
पवनानगर – संशयित वाहनांची तपासणी मोहीम गुरूवारी सांयकाळी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या आदेशानुसार सुरू असताना चोरीच्या दुचाकी सह पोलीसांच्या हाती लागला आहे.
त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. अंकुश रामभाऊ फालेफाले (रा.चिखलगाव , ता. मुळशी, जिल्हा पुणे) असे या दुचाकी चोरट्याचे नाव . लोणावळा ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस नाईक नितिन कदम, संतोष शेळके, पोलीस मित्र भिमा वाळुंज, श्रीकांत घरदाळे, हे पवनानगर येथे नाकाबंदी करत असताना संशयित वाहन दुचाकीस्वार यास पकडले, त्यास गाडीचे कागदपत्रे मागीतली असल्याने त्याने उडवा- उडविची उत्तर दिल्याचे निदर्शनास आले. गाडी क्रमांक ( MH 12 HK 5544) तपास केला असता गाडी चोरीची असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी चोरास ताब्यात घेतले आहे.