चालकाच्या प्रसंग सावधावनामुळे वाचला प्रवाशांचा जीव
पत्रकार – सागर घोडके/पुणे (मावळ)
मावळ – मुंबईच्या दिशेने निघालेल्या मुंबई – पुणे एक्सप्रेसवर अोझार्डे गावाजवळ सोमवारी पहाटे अडीच वाजलेच्या सुमारास एका बसला आग लागली. या आगीत बस पुर्ण पणे जळुन खाक झाली.
मुंबईच्या दिशेने निघालेल्या बसला अोझार्डे गावाजवळ अचानक आग लागली. या घटनेत चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला. गाडीने पेट घेतला हे समजताच चालकाने गाडी बाजूला घेत सर्व प्रवासी बसमधून खाली उतरवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती समजताच देवदूत यंत्रणा व आयआरबीच्या अग्निशमन पथकाने घटना स्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत बस पुर्ण पणे जळुन खाक झाली होती. पण यात कोणतीही हानी झाली नाही.