जुनिकामठी येथील युवकाचा दारूच्या नशेमुळे मुत्यु
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत ८ किमी अंतरावरी ल जुनीकामठी येथील रहिवासी मनोज मनिष करनाके वय २५ वर्ष हा युवक दारू पिण्याचा वाईट व्यसनामुळे नेहमी घरा बाहेर राहण्याच्या सवयीचा असुन त्याचा दारूच्या नशेत नाल्याजवळ पडुन मृत्यु झाल्याने कन्हा न पोलीसांनी मर्ग नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार शुक्रवार (दि.२३) जुलै २०२१ ला रात्री १०:३० वाजता दरम्यान जुनिकामठी येथील मनोज मनिष करनाके वय २५ वर्ष हा युवक घरून जेवन करून घराबाहेर गेला व रात्री घरी परत न आला नाही. शनिवार (दि.२४) जुलै २०२१ चे सकाळी ६ ते ६:३० वाजता त्याचे वडील सकाळी बाहेर प्राथमिक विधीकरिता गेले असता त्यांना मनोज हा नाल्याजवळ पडलेल्या व त्याचा कानातुन व नाकातुन रक्त निघत असल्याचे आढळुन आल्याने लोकांना बोलावुन पाही ले असता तो दारूच्या नशेत मरण पावला असल्याने कन्हान पोलीसांना घटनेची माहीती दिली. पोलीसानी घटनास्थळी पोहचुन फिर्यादी सौ उमाबाई सिताराम करनाके वय ४८ वर्ष राह. वार्ड क्र २ जुनीकामठी यां च्या तोंडी रिपोर्ट वरून कन्हान पोलीस स्टेशन येथे मर्ग क्र २७/ २०२१ कलम १७४ जाफौ अन्वये प्रकरण नोंद करण्यात आले असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांचे मार्गद र्शनात एपीआई अमितकुमार आत्राम हे करीत आहे.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा
9579998535