१२ आमदारांचे निलंबन रद्द करून ओबीसी आरक्षण लागु करण्याची मागणी भाजपा पारशिवनी तालुका, कन्हान शहर व्दारे पोलीस स्टेशन मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.
Summary
कन्हान : – महाराष्ट्र विधानसभेच्या पहिल्या दिवशी भाजप च्या आमदारांनी ओबीसी आरक्षण लागु कर ण्याच्या मुद्य्यावरून विधानसभेत गोंधळ केल्याने सरकारने भाजपचे १२ आमदार निलंबित केल्याचा जाहिर निषेधार्थ भाजपा पारशिवनी तालुका, कन्हान शहर पदाधिका-यांनी कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांचा मार्फत […]
कन्हान : – महाराष्ट्र विधानसभेच्या पहिल्या दिवशी भाजप च्या आमदारांनी ओबीसी आरक्षण लागु कर ण्याच्या मुद्य्यावरून विधानसभेत गोंधळ केल्याने सरकारने भाजपचे १२ आमदार निलंबित केल्याचा जाहिर निषेधार्थ भाजपा पारशिवनी तालुका, कन्हान शहर पदाधिका-यांनी कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांचा मार्फत मा. मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवुन तात्काळ १२ आमदार परत घेऊन राज्यात ओबीसी आरक्षण लागु करण्याची मागणी केली आहे.
राज्याचा महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात विशेष प्रयत्न न केल्याने व ईम्पिरिकल डाटा तयार न केल्याने सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याचा निर्णय दिल्या ने भाजपच्या आमदारांनी ओबीसी ला आरक्षण लागु करा हा मुद्दा विधानसभेत उठविण्याचा प्रयत्न केला असता सरकारने भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केले. ओबीसी समाजाला न्याय द्यावा व भाजप च्या १२ आमदारांचे निलंबन मागे घ्यावे. या करिता भाजपा पारशिवनी तालुका, कन्हान शहर च्या पदाधिका-यांनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे यांच्या नेतृत्वात व शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या उपस्थितीत कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल अंबरते यांचा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवुन तात्काळ ओबीसी आरक्षण लागु करून १२ आमदारांना परत घेण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद उपगट नेता श्री. वेंकटेशजी कारेमोरे, भाजप तालुका अध्यक्ष अतुलजी हजारे, कन्हान शहर अध्यक्ष डॉ. मनोहर पाठक, तालुका उपाध्यक्ष शिवाजी चकोले, कामेश्वर शर्मा, नरेश पोटभरे, सौ.सरीताई लसुंते, सुनिल लाडेकर, रिंकेश चवरे, अजय लोंढे, भरत साळवे, आनंद शर्मा, हल्दीराम कनोजिया, शैलेश शेळके, मयूर माटे, सौरभ पोटभरे, ऋृषभ बावनकर, सचिन वासनिक, अमन घोडेस्वार, दिनेश नानवटकर, धर्मेंद्र गणवीर, सौ.सुषमाताई मस्के, सौ.तुलेशाताई नानवटकर सह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज
9579998535