स्वामी विवेकानंद यांना श्रद्धांजली अर्पण
कन्हान : – स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमि त्य कन्हान शहर विकास मंच व्दारे कन्हान-पिपरी नगरपरिषद येथील स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पित करून पुण्य तिथी साजरी करण्यात आली.
रविवार (दि.४) जुलै २०२१ ला कन्हान शहर विकास मंच द्वारे स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्य कन्हान-पिपरी नगरपरिषद येथील स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला मंच अध्यक्ष प्रविण गोडे यांच्या हस्ते पुष्पहार माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. याप्रसंगी मंच सचिव प्रदीप बावने, महासचिव संजय रंगारी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सर्व उपस्थित मंच पदाधिका-यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून दोन मिनट मौनधारण करून भावपुर्ण श्रद्धांजली अर्पित करित स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी कन्हान शहर विकास मंच कार्यकारी संस्थाप क अध्यक्ष ऋृषभ बावनकर, मंच अध्यक्ष प्रविण गोडे, सचिव प्रदीप बावने, महासचिव संजय रंगारी, कोषा ध्यक्ष हरीओम प्रकाश नारायण, प्रविण माने, जिवन ठवकर, वैशाली खंडार, पौर्णिमा दुबे, प्रकाश कुर्वे, अखिलेश मेश्राम सह आदी मंच पदाधिकारी प्रामुख्या ने उपस्थित होते.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज
9579998535