स्कार्पियो गाड़ीत ०३ गोवंश १ गोरा व २ गाय भरु न नेतांना पकडुन जनावरांना दिले जिवनदान कन्हान पोलीसांची कारवाई २ आरोपी अटक करून एकुण २,११,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत एम.जी नगर येथे कन्हान पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना एक स्कार्पि यो गाडीत तीन गोवंश १ गोरा व २ गाय निर्दयतेने दोरा ने बांधुन चारा पाण्याची सोय न करता कत्तली करीता घेऊन जातांनी मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून २ लाख ११ हजार रू चा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली.
प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.१३) जुलै ला पहाटे ४ ते ४ : ४५ वाजता दरम्यान कन्हान पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना एम.जी.नगर येथे एक स्का र्पियो गाड़ी क्र. एम एच ०५ एजे ६४६६ मध्ये १ गोरा , २ गाय असे ३ गोवंश गाडीत निर्दयतेने भरून दोराने बांधुन चारा पाण्याची सोय न करता कत्तली करीता घेऊन जातांनी मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी आरोपी १) मुस्तकीत खान, राह. कामठी, २) मो आसीफ मो ईकबाल अंसारी राह. नागपुर यांना अटक करून त्यांच्या ताब्यातील १ गोरा , २ गाय किंमत ११,००० रुपये व स्कार्पियो गाड़ी किंमत २,००,००० रुपये असा एकुण २,११,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून सरकार तर्फे फिर्यादी मंगेश सोनटक्के पोलीस स्टेशन कन्हान यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपी विरुद्ध अप क्र २५८/२१ कलम ११(१)(अ) (ड) (इ) (फ), प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम ५ अ, ब, ९, मोटार पशु संरक्षण अधिनियम १८४ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार वाई कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस नापोशी कृणाल पारधी हे करीत आहे.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535