सौ पुष्पा कोंडलवार मुख्याध्यापिका यांचा सेवानिवृत्त शिक्षक निरोप समारंभ.शिक्षकांनी संघटित व एक राहावे काळाची गरज — संजय निंबाळकर
Summary
शाळेच्या विकासात शिक्षकांची भूमिका फार महत्वपूर्ण असून त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांप्रती कर्तव्याची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे मत डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद चे राज्य उपाध्यक्ष मा,शांताराम जळते यांनी सेवानिवृत्त शिक्षक निरोप समारंभप्रसंगी डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपूर कार्यालयात […]
शाळेच्या विकासात शिक्षकांची भूमिका फार महत्वपूर्ण असून त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांप्रती कर्तव्याची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे मत डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद चे राज्य उपाध्यक्ष मा,शांताराम जळते यांनी सेवानिवृत्त शिक्षक निरोप समारंभप्रसंगी डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपूर कार्यालयात सौ कोंडलवर मॅडम यांचे सेवानिवृत्त कार्यक्रमात आपले विचार वक्त करतांना अध्यक्षपदावरून बोलतांना व्यक्त केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर, पाहुणे मनून नागपूर विभागीय महिला संघटक हर्षा वाघमारे, जिल्हाधक नंदलाल यादव,सासू नंदा वाळके,माध्य सचिव संजीव शिंदे, प्राथ जिल्हाधक्स मेघराज गवखरे ,सचिव विनोद चिकटे ,महिला संघटक चेतना कांबळे,पक्षभान ढोक ,लोकोत्तम बुटले,नैताम सर ,समीर शेख, उपस्थित होते .
सर्वप्रथम सरस्वती पुजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर व संघटनेचे पदाधिकारी यांचे हस्ते सेवानिवृत्त राष्ट्रीय उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सौ पुष्पा नरेश कोंडलवार यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्कारमूर्ती श्रीमती सौ पुष्पा कोंडलवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संजीव शिंदे,हर्षा वाघमारे ,नंदा वाळके, मेघराज गवखरे,पक्षभान ढोक व इतर मान्यवर यांची समोयोचीत भाषणे झाली.आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.