सेंट्रल बॅंक कन्हान येथे मेगा क्रेडिट एक्सपो कार्यक्रम संपन्न
कन्हान : – सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया कन्हान शाखे व्दारे मेगा क्रेडिट एक्सपो कार्यक्रमाचे आयोजन करून बॅंके के मार्फत कमी व्याज दराने कर्ज पुरवठा करण्यात येत असुन सविस्तर माहीती देऊन नागरिकांनी शासना च्या विविध योजनाचा लाभ घेण्याबाबद मार्गदर्शन करण्यात आले.
सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया क्षेत्रिय कार्यालय नागपुर व्दारे दोन दिवसीय मेगा क्रेडिट एक्सपो कार्यक्रमांतर्ग त सेंट्रल बॅक ऑफ इंडिया कन्हान शाखे व्दारे शनिवार (दि.२३) ला सकाळी ११.३० वाजता वेकोलि गोंडेगाव उपक्षेत्रिय प्रबंधक मा.वरूणकुमार त्रिवेदी, सेंट्रल बॅंक प्रबंधक क्षेत्रिय कार्यालय नागपुर मा.अनिल अटलुरी सर, युवा उद्योजक सिध्दार्थ कांबळे, ग्रामिण पत्रकार संघ नागपुर जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, माजी जि प उपाध्यक्ष शरद डोणेकर, कन्हान नगराध्य क्षा करूणाताई आष्टणकर आदीच्या हस्ते दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कन्हान शाखा प्रबंधक सौ यशोधरा घरडे हयानी प्रास्ताविका तुन सेंट्रल बॅंक व्दारे मेगा क्रेडिट एक्सपो योजने अंत र्गत सर्वात कमी वार्षिक व्याज दरात बेरोजगार युवक, युवती व नागरिकांना स्वत:ची व परिवाराची उन्नती करिता आर्थिक अडचण भासु नये म्हणुन योग्य मार्ग दर्शन करून वाहन कर्ज, शिक्षण कर्ज, एमएस एमई, शेती कर्जा सह शासनाच्या योजनेचा लाभ देण्याचा मानस व्यकत केला. यावेळी मा वरूणकुमार त्रिवेदी हयानी सेंट्रल बॅंकेचे व्याज दर अत्यत कमी असल्याने कामगाराना सुध्दा व्यकतिक व इतर कर्ज देण्याकरिता वेकोलि गोंडेगाव येथे कार्यक्रम घेऊन कामगाराना सुध्दा लाभ द्यावा.असे मनोगत व्यकत केले. सर्व मान्य वरांनी कन्हान शाखेच्या सेवाकार्याचे कौतुक करून सेवाकार्य चांगले करण्याकरिता कर्मचारी वाढविण्या ची इच्छा व्यकत केली. कार्यक्रमाचे संचालन शाखा प्रबंधक यशोधरा घरडे यांनी तर आभार राजश्री वाघ मारे हयानी व्यकत केले. कार्यक्रमास बॅंकेच्या दर्शना बोरकर, ग्रामिण पत्रकार संघ कन्हान अध्यक्ष रमेश गोळघाटे, सचिव सुनिल सरोदे, उपाध्यक्ष कमलसिंग यादव, रविंद्र दुपारे, ऋृषभ बावनकर, टाटा कंपनीचे अनुराग श्रीवास्तव, पवन माने, सुनिल अंबागडे, मनोज शेंडे, बेबी वासनिक, अनिता चवरे, महिला बचत गटा च्या वर्षा तडस, सुनिता वानखेडे, मोना शेंडे, विठ्ठलराव बोरकर, ईश्वर पाटील, शिवशक्ती चहांदे, राजु पोटभरे, प्रविण माने, हफीज सिध्दीकी, पिंटु निंबाळकर, एक नाथ वैद्य, चेतन वैद्य, अरविंद मोहकर, नाना नांदुरकर, मोनिश जयस्वाल, प्रज्वल कापसे सह ग्राहक बहु संखेने उपस्थित होते.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535