नागपुर

सावनेर च्या हितेश बन्सोड यांनी महिला व तिच्या १५ दिवसाच्या बाळास दिला आधार

Summary

कन्हान : – मुलीला जन्म दिल्याने पतीने स्विकार न केल्याने निराधार झालेल्या छतीसगढ राज्यातील राजनांदगाव च्या कुमारीबाई हिने न खचता मुलीला जगविण्या करिता तिथुन निघुन भटकत कन्हान रेल्वे स्टेशन ला पोहचल्यावर कन्हान च्या प्रशांत पाटील दिसल्याने बाळा मेश्राम हयानी हितज्योती […]

कन्हान : – मुलीला जन्म दिल्याने पतीने स्विकार न केल्याने निराधार झालेल्या छतीसगढ राज्यातील राजनांदगाव च्या कुमारीबाई हिने न खचता मुलीला जगविण्या करिता तिथुन निघुन भटकत कन्हान रेल्वे स्टेशन ला पोहचल्यावर कन्हान च्या प्रशांत पाटील दिसल्याने बाळा मेश्राम हयानी हितज्योती फाऊंडेशन सावनेर चे हितेशदादा बन्सोड शी संपर्क करून निरा धार कुमारीबाई व तिच्या १५ दिवसाच्या बाळास आधार देत मानुष्की जोपसली.
रेल्वे स्टेशन कन्हान येथे छतीसगढ राज्यातील दुर्ग जिल्हयात शासकीय रूग्णालयात कुमारीबाई हिने गोळस बाळाला जन्म दिला. परंतु मुलगी झाल्याने तिच्या पतीने स्विकार करण्यास नकार दिल्याने ती न खचता हिंमतीने मी काहीपण करून माझ्या गोळस मुलीला जगविण्याकरिता १५ दिवसाचे बाळ घेऊन कुमारीबाई दुर्ग वरून कसीतरी कन्हान रेल्वे स्टेशनवर पोहचली रात्री ९ वाजता रेल्वे स्टेशन समोर बाळास घेऊन भटकत असताना कन्हान येथील प्रशांत पाटील यांना दिसल्याने तिची विचारपुस केली असता तिची आप बिती ऐकल्यावर कन्हान पोलीस स्टेशन ला माही ती दिली. स्टाप कमी आणि पहिलेच चार प्रकरणे आहे . पोलीसानी म्हटल्यावर प्रशांत पाटील यांनी समाज सेवी बाळा (रजंनिश) मेश्राम यास बोलावुन हकीकत सांगितल्याने या महिला व बाळाची मदत फक्त हितेश दादा बन्सोड करू शकतो. तेव्हा हितेश दादाला फोन करून माहीती दिली असता त्यांनी आपली अँब्युलस घेऊन येण्यास होकार दिला. कन्हान पोलीस स्टेशनचे दोन पोलीसानी चौकसी करून ती सज्ञान असल्याने काही करण्यास असमर्थता दर्शवली. रात्र झाल्याने प्रशांत पाटील व अविनाश चौधरी यांनी आपल्या घरू न जेवन व चांदर, शाल व गरम कंबल कुमारी बाईस आणुन नगदी २५० रूपये देऊन रेल्वे स्टेशन च्या आत जेवण देऊन तात्पुरती व्यवस्था केली. रात्री ११ वजता परत घरून गरम कंबल, मोजे, रूमाल व लहान बाळा करिता स्वेटर आणुन दिले.
हितज्योती फाऊंडेशन सावनेर, हितेश दादा बन्सोड हे रोडवरील निराधार, अनाथ, बेवारस, अपंग लोकाच्या मदती करिता सदैव कार्य करित असुन साव नेर वरून कन्हान ला येताना रस्त्यात माळेगाव जवळ एका हरिणाचा अपघात झाल्याचे आढळल्याने थांबुन त्याची पाहणी करून वनविभास माहीती देऊन प्राणी रक्षक पथकाच्या त्या हरिणाला स्वाधिन करून कन्हा न ला १२.३० वाजता हितेश दादा पोहचुन कुमारीबाई व बाळाची विचारपुस करून तिच्या मदतीच्या हाकेने सावनेर ला नेण्याकरिता कन्हान पोलीस स्टेशन ला हेकॉ शेळके यांनी नोंद करून घेतली. मध्यरात्री १.३० वाजता अँब्युलस मध्ये बसवुन सावनेर ला घेऊन गेले. निराधार कुमारीबाई व तिच्या १५ दिवसाच्या गोळस मुलीला मदतीचा आधार दिला. याप्रसंगी हितज्योती फाऊडेशन सावनेर चे हितेश दादा बन्सोड सहकारी रजत रूसिया, राजा फुले, उमेश मोरे आणि कन्हान चे प्रशांत पाटील, बाळा (रंजनिश) मेश्राम, अविनाश चौध री, देशौन्नती पत्रकार मोतीराम रहाटे, ऋृषभ बावनकर, सोनु मसराम, श्रीकांत पाटील आदीने मानुष्की जोपस त महत्वाची भुमिका पार पाडली.

राहुल भोयर
नागपूर शहर प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *