सहा जून रोजी मिनिवाडा येथे इंदुरीकर महाराजांचे कीर्तन
कोंढाळी प्रतिनिधी –
श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान श्री क्षेत्र मिनिवाडा येथे राष्ट्रीय कीर्तनकार व समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे समाज प्रबोधन पर किर्तन नागपूर जिल्ह्यातील काटोल नरखेड तालुक्यात प्रथमच मीनिवाडा या गावी होत असल्याने उत्सुकता लागून आहे.
हे किर्तन ( दि.०६)जून मिनिवाडा येथील सुप्रसिध्द विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाचे भव्य प्रांगणात सायंकाळी ०५ते ०७वाजता होणार असुन राज्याचे माजी गृहमंत्री व आमदार अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.