समाजाकडुन पाठीवर कौतुकाची थाप सामाजसेवक प्रशांत मसार व्दारे धर्मराज शाळेतील कोविड निराश्रित विद्यार्थी दत्तक योजनेचे कौतुक.
नागपूर कन्हान : – येथील धर्मराज प्राथमिक शाळेत माणुस कीचा परिचय देत कोविड मुळे मृत्यु झालेल्या कुटुंबातील निराश्रित बालकांना शैक्षणिक दत्तक घेण्यात येत आहे. या दत्तक योजनेचे कौतुक (दि.१३) समाजसेव क प्रशांत बाजीराव मसार यांनी केले. यावेळी प्रशांत बाजीराव मसार व योगशिक्षक मिलिंद मेश्राम यांनी निराश्रित दत्तक योजनेचे प्रमुख श्री भिमराव शिंदेमेश्रा म व श्री खिमेश बढिये यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या निराश्रित दत्तक योजनेंतर्गत धर्मराज प्राथमिक शाळेत आतापर्यंत यश देवेंद्र शेंदरे (कांद्री) व सार्थक शिवशक्ती सोनबरसे (नवीन गोंडेगाव) या विद्यार्थ्यांला इयत्ता पहिली मध्ये प्रवेश देऊन शाळे तर्फे दत्तक घेण्यात आले. यात विद्यार्थ्यांला प्राथमिकचे पूर्ण शिक्ष ण, शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती योज नेचा लाभ व इतर बाबीत शाळेकडून सहकार्य करण्या त येणार असल्याचे या मोहिमेचे प्रमुख श्री भिमराव शिंदेमेश्राम यांनी सांगितले. या सत्कार कार्यक्रमात मुख्याध्यापक आशा हटवार, दत्तक पालक योजनेचे प्रमुख श्री खिमेश बढिये, श्री भिमराव शिंदेमेश्राम, सौ चित्रलेखा भोयर, श्री अमित मेंघरे, सौ प्रिती सेंगर, हर्षकला चौधरी उपस्थित होते. योजनेंतर्गत निराश्रित बालकांनी लाभ घ्यावा, तसेच कोविड १९ अंतर्गत शासकीय योजना व मदतीसाठी समाजसेवक श्री प्रशांत बाजीराव मसार पिपरी – कन्हान यांच्याशी 9595553381, 9518322567 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार यांनी केले आहे.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535