नागपुर

श्री सुर्यषष्टी पर्वावर कन्हान नदी घाट व पिपरी घाटावर मावळत्या व उगवत्या सुर्याची आराधना कन्हान नदी घाटावर छठ पुजा उत्सव थाटात.

Summary

कन्हान : – शहरात अडीच महिन्यांपासुन कोरोना पुर्ण पणे नियंत्रणात असुन ही सकारात्मक बाब लक्षात घेता यावर्षी कन्हान शहरात श्री सुर्यषष्टी महाव्रत पर्व बडकी छट, सांध्य छट कन्हान नदी पुल घाट व पिपरी घाटावर छठ पुजे करिता कन्हान नदी रेल्वे […]

कन्हान : – शहरात अडीच महिन्यांपासुन कोरोना पुर्ण पणे नियंत्रणात असुन ही सकारात्मक बाब लक्षात घेता यावर्षी कन्हान शहरात श्री सुर्यषष्टी महाव्रत पर्व बडकी छट, सांध्य छट कन्हान नदी पुल घाट व पिपरी घाटावर छठ पुजे करिता कन्हान नदी रेल्वे व नविन पुलाजवळ आणि पिपरी घाटावर व्रतधारी महिला पुरू षानी नदी किनारा घाटावर छठ पुजे निर्मित सांयकाळी मावळत्या व दुस-या दिवसी पहाटे उगवत्या सुर्याची पुजा अर्चना सह आराधना करून छठ पुजा थाटात साजरी करण्यात आली.
कन्हान परिसरात कोळसा खाणी असल्याने उत्तर भारतीय लोकांचे ब-याच प्रमाणात वास्तव असल्याने कन्हान नदी किणा-यावर उत्तर भारतीय लोकांचा मह त्वाचा श्री सुर्यषष्ठी महाव्रत पर्व बडकी छठ पुजा ही भगवान सुर्यदेवाच्या उपासनेचा उत्सव चार दिवस साजरा करण्यात येत असुन छठ पुजेचा सण कार्तिक शुक्ल षष्ठीला साजरा केला जात असला तरी त्याची सुरुवात कार्तिक शुक्ल चतुर्थी छठ पुजेचा पहिल्या दिवसी (नहाय खाय) सोमवार (दि.८) नोव्हेंबर ला स्नान करून नवीन कपडे घालुन उपवास ठेवुन कर ण्यात आला. छठ पुजेचा दुस-या दिवसी (खरना) मंगळवार (दि.९) ला कार्तिक शुक्ल पंचमीला दिवस भर उपवास करून संध्याकाळीही उपवास केला. त्यास खरना म्हणतात. या दिवशी अन्नपाणी न घेता उपवास करून तांदुळ आणि गुळाची खीर संध्याकाळी खाल्ली. छठ पुजेचा तिस-या दिवसी आज बुधवार (दि.१०) नोव्हेबर ला अर्घ्य ते मावळत्या सुर्या पर्यंत नैवेद्य षष्ठीच्या दिवशी दिला. बांबुच्या टोपल्यां मध्ये प्रसाद आणि फळे सजवुन टोपलीची पुजा केल्या नंतर सर्व भक्त सुर्याला अर्घ्य देण्यासाठी तलाव, नदी किंवा घाट आदी ठिकाणी जाऊन स्नान करून मावळत्या सुर्याची पुजा अर्चना केली. विधिवत पुजा आणि प्रसाद वितरण करून बडकी छठ पुजा करून सांध्य अर्ध देऊन मावळत्या व दुस-या दिवसी पहाटे उगवत्या सुर्याची पुजा आणि आराधना करून कन्हान नदी घाटावर छठ पुजा उत्सव थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कन्हान नगरपरिसद, कांद्री व टेकाडी (को.ख) ग्राम पंचायत आणि राजकिय पक्षा व्दारे स्वागताची व्यवस्था करून भाविकांना चाय, काफी, फळ आणि प्रसाद वितरण करण्यात आला.
छठ पुजेच्या याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रश्मीताई बर्वे, प स सभापती सौ मिनाताई कावळे, प स सदस्या मंगला निंबोणे, कन्हान नगराध्यक्षा करूणा ताई आष्टणकर, उपाध्यक्ष डायनल शेडे, नरेश बर्वे, कांद्री सरपंच बळवंत पडोळे, उपसरपंच श्यामकुमार बर्वे, नगरसेवक राजेन्द्र शेंदरे, अजय लोढे, कामेश्वर शर्मा, चंद्रशेखर भिमटे, दिलीप मेश्राम, मनोज राय, बलीराम यादव, चंदन सिंह, सुजीत खरवार, धंनजय सिंह, प्रताप सिंह, विजय तिवारी, राजु सहानी, चंद्र शेखर सिंह, ओमप्रकाश पाल, कमलेश गुप्ता, अजित सिंह, संतोष गुप्ता सह सामाजिक, राजकीय मंडळी , छट पुजा उत्सव सामितीचे पदाधिकारी, भाविक प्रामु ख्याने उपस्थित होते. नदी प्रवाहात कुठलिही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन ढिवर समाज सेवा संघटना कन्हान व्दारे जिवन रक्षा पथकाचे सुतेश मारबते, बालचंद बोंदरे, मंगल बावने, विजय गोंडाणे, राजु मारबते, सचिन खंडाते, संजय मेश्राम, सुधाकर सहारे, हेमराज मेश्राम तैनात होते. कन्हान नगरपरिषद, कांद्री, टेकाडी (को.ख) अधिकारी, कर्मचारी आदीने व्यवस्था सांभा ळुन पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *