शेतमजुराचा लाईनमॅन च्या दिरंगाई व निष्काळपणामुळे मुत्यु झाल्याने गुन्हा दाखल.
पारशिवनी (कन्हान) : – उमरी शेत शिवारात शेतमजुर पंकज भुरे यांचा खाली पडलेल्या विदूत तारा चा विदुत शॉक लागुन घटनास्थळीच मुत्यु झाला होता. पोलीस तपासात लॉईनमॅन चंद्रभान खैरे यांच्या कर्तव्यात दिरंगाईने व निष्काळजीपणाने शेतमजुरा चा मुत्यु झाल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत १५ किमी अंतरावरील मौजा उमरी शिवार शेतात (दि.१८़) जुन २०२१ चे दुपारी १:०० वाजता च्या सुमारास मृतक पंकज शंकरराव भुर्रे वय ३० वर्ष राह. उमरी हा शेती मजुरीचे कामाकरिता राहुल ढोरे यांचे शेतात गेला होता. शेता मध्ये ११ के.व्ही विद्युत लाईनची एक तार बाजुच्या शेतातील सागवनाचे झाड पडल्याने तार तुटुन शेतात पडला असता तो पीव्हीसी पाईप ने बाजु ला करण्यात गेला असता त्याला विद्युत शाॅक लागुन तो घटनास्थळीच मरण पावला. आरोपी चंन्द्रभान दत्तुजी खैरे लाईनमॅन वय ५२ वर्ष राह. महावितरण कार्यालय मनसर यास ११ के.व्ही विद्युत लाईनचे तार तुटल्याची माहिती मिळुन सुद्धा त्यांनी त्यांचे कर्तव्यात दिरंगाई केल्याने त्याच्या निष्काळजीपणा मुळे पंकज भुर्रे यांचा अपघाती जिव गेल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने मर्ग च्या चौकशी रिपोर्ट वरून गुन्हा नोंद करण्यात आला. सदर प्रकरणी सरकार तर्फे फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा पळनाटे पोस्टे पारशिवनी यांचे तक्रारी वरून आरोपी लाईनमॅन चंद्रभान खैरे यांचे विरुद्ध कलम ३०४ (अ) भांदवि कायदान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन गुन्ह्याचा पुढील तपास पारशिवनी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांचा मार्गदर्शनात पोउपनि नागुलवार हे करित आहे.