शाळेकरी विद्यार्थ्यां च्या बस सेवांना प्राधान्य द्यावे. प्रमोद चाफले
कोंढाळी -प्रतिनिधी -दुर्गाप्रसाद पांडे
१८जूलै चे सायंकाळी झालेल्या वादळी पाऊसामुळे ग्रामीण भागातील नदी नाले भरून वाहू लागल्याने आप आपल्या गावी जाणार्या विद्यार्थ्यांची कोंडी झाल्याची माहिती कोंढाळी ग्रा प चे सदस्य व भा ज प युवा चे पदाधिकारी प्रमोद चाफले यांनी बस स्थानक गाठले व आगार व्यवस्थापकाशी संपर्क करून शाळेकरी विद्यार्थ्यांच्यासाठी अतिरिक्त बस ची व्यवस्था केली तेंव्हा शाळेकरी विद्यार्थ्यां आपल्या गावी पोहचले.
नागपूर -अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कोंढाळी बस स्थानक ग्रामीण भागातील सर्वात ज्यास्त प्रवासी व विद्यार्थी वाहतूकिचे वाहतूक नियंत्रक कक्ष आहे. या केंद्रावरुन लगतच्या 42 गावांचे
के- जी टू-पीजी आणि तांत्रिक शिक्षणाचे (शाळा, इंग्रजी माध्यम, महाविद्यालय, आय टीआय, टायपिंग, शिवणकला इ. व्यावसायिक प्रशिक्षण) साठी कोंढाळी येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1785 पेक्षा जास्त आहे. येथुन आदिवासी बाहूल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी-येण्यासाठी बस चे नियोजन वेळवर करा अशी मागणी भा ज प युवा मोर्चा चे प्रमोद चाफले यांनी केली आहे.
कोंढाळी बस स्थानकावरून संध्याकाळच्या शालेय बस फे-या नेहमीच ऊशिरा लावन्यात येत असते अशी तक्रार शालेय विद्यार्थ्यांची असून संबंधित गावच्या शालेय बस फे-या नियोजित वेळेवर सोडावी या करिता प्रमोद चाफले यांनी आगार व्यवस्थापक अनंत तातर यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
या बाबतीत आगार व्यवस्थापक अनंत तातर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की काटोल आगारातून सुटणा-या प्रवासी बस सेवेत विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या बस सेवा प्रथमप्राधान्य क्रमांकावर सोडण्यात येतात.
सध्या काटोल आगाराचे क्षेत्रातील प्रवासी व विद्यार्थी बस सेवेकरिता 64प्रवाशी बसेस ची आवश्यकता आहे. मात्र सध्या काटोल आगारात 50प्रवाशी बसेस असून यातही 06प्रवासी बसेस दुरुस्ती साठी विभागीय कार्यशाळेत पाठविल्या गेल्या आहेत. शाळा सुटल्यावर एकाच वेळी सर्व गावांना वेळेवर बससेवा देण्यावर भर असतो मात्र पावसाळ्यात कधी कधी ग्रामीण भागातील नदी नाल्यांना पुर आल्यावर कधी काळी नियोजन साधन्यात कठिण जाते अश्या प्रसंगी विद्यार्थी,पालक, व जनप्रतिनिधीनीं एस टी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही केले आहे.
*पास करिता अतिरिक्त वाहतूक नियंत्रकाची आवश्यकता*
सध्या कोंढाळी येथील वाहतूक नियंत्रण केंद्रात दोन वाहतूक नियंत्रक नियुक्त आहेत. कोंढाळी बसस्थानक, ज्यामध्ये संबंधित वाहतूक नियंत्रकांच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत एकच वाहतूक निरीक्षक ड्युटीवर असतो. मात्र या काळात एकच वाहतूक नियंत्रक कामगिरीवर असतो आणि तोही एकच शिफ्ट मधे असतातो. महामार्गावरील प्रवासी वाहतूक बसेसमध्ये तांत्रिक बिघाड, अपघातांची बस चालकाकडून आलेल्या तक्रारी वरिष्ठ कार्यालयात पाठविताना मोठी अडचण होते.
दुसरीकडे, पुढील महिन्यापासून शाळा-महाविद्यालये, तंत्रशिक्षण आणि उच्च शिक्षण सुरू होणार आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय सवलत प्रवाशी पास, आवडेल तेथे प्रवासाकरीता पासेसचे वितरण सोबतच दररोज च्या 442 बसेसच्या लॅगसीटवर एन्ट्री दोन्ही काम एकाच वेळी करता येत नाही, त्यामुळे स्थानिक व प्रादेशिक दळणवळण नियोजन नियोजित ठेवण्यासाठी नागपूर विभाग नियंत्रक व काटोल आगार व्यवस्थापक यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या पालकांनी कोंढाळी बस वाहतूक नियंत्रण केंद्रात बसेसच्या वाहतूक एन्ट्री साठीअसलेल्या दोन वाहतूक नियंत्रकां ऐवजी व विद्यार्थ्यांना पासेस वाटप करण्यासाठी एक अतिरिक्त नियमित वाहतूक नियंत्रक नेमण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणी काटोल आगाराचे आगार प्रमुख अनंत तारट यांना विचारले असता त्यांनी सांगितले की शाळा अतिरिक्त वाहतूक नियंत्रकाची आवश्यकता भासल्यास अतिरिक्त नियुक्ती केल्या जाऊ शकते.
