वीज पंप चोरांची टोळी कोंढाळी पोलीसांनी पकडली मुद्देमालसह दोन आरोपींना अटक विद्युत पंपाची चोरी करणाऱ्या आरोपींना कोंढाळी पोलिसांनी पकडले.

कोंढाळी – वार्ताहर दुर्गाप्रसाद पांडे
कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आजूबाजूच्या गावातील शेतकरी विद्युत पंप चोरणाऱ्या टोळीने हैराण झाले होते, या टोळी शेताच्या कोठ्यातून विद्युत पंप चोरत असत, या टोळीला अखेर कोंढाळी पोलिसांनी जेरबंद केले आहे. सोमवार, 12 जून रोजी कोंढाळीपासून 10 किमी अंतरावर असलेल्या कामठी येथील शेतकरी दुर्गादास चंपतराव किणेकर यांनी शेत विहिरीतील 03 एचपी चा विद्युत पंप किंमत (20,000 रुपये) चोरीला गेल्याची फिर्याद दिली असता, कोंढाळी चे पंकज वाघोडे यांनी गुन्हा क्रमांक 498/23नोंदवून कलम 454, 457, 380भा द वि अंतर्गत आँन डिवटी स्टाफ नायब शिपाई सुनील ठोंबरे व शिपाई गोविंद मैंद यांच्यासह तपासात आकाश देविदास नेहारे (27), प्रभाकर महादेव नेहारे (35) दोन्ही कामठी येथील रहिवासी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली.तपासाअंती आरोपींनी विद्युत पंप चोरी केल्याची कबुली दिली. तसेच आरोपींनी लपवून ठेवलेला 03 एचपीचा विद्युत पंप आरोपि कडुन जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच परिसरातील चोरी गेलेले विद्युत पंपाची चौकशी ही सुरू आहे.