विद्यार्थी देशाचे आधार तर प्राध्यापक आधार स्तंभ निर्माते।
Summary
बाळासाहेब जाधव कोंढाली -वार्ताहर येथील आर बी व्यास महाविद्यालयाचे प्रेरणास्थान राजेंद्रसिंह उर्फ बाबा व्यास यांचे 28व्या पुण्यतिथी निमित्य 07आक्टोबर ला सकाळी 10-00वाजता येथील सहकार नेते बाळासाहेब जाधव यांचे अध्यक्षेते आर बी व्यास कला वाणिज्य महाविद्यालयात राजेंद्र सिंह व्यास यांचे पुण्यतिथी […]
बाळासाहेब जाधव
कोंढाली -वार्ताहर
येथील आर बी व्यास महाविद्यालयाचे प्रेरणास्थान राजेंद्रसिंह उर्फ बाबा व्यास यांचे 28व्या पुण्यतिथी निमित्य 07आक्टोबर ला सकाळी 10-00वाजता येथील सहकार नेते बाळासाहेब जाधव यांचे अध्यक्षेते आर बी व्यास कला वाणिज्य महाविद्यालयात राजेंद्र सिंह व्यास यांचे पुण्यतिथी निमित्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या प्रसंगी बाळासाहेब जाधव यांनी सांगितले कि स्व राजेंद्र सिंह व्यास यांचे ग्रामीण भागातील शिक्षण,आरोग्य, कृषी सेवेला महत्वपूर्ण स्थान देण्यासाठी समर्पित होते। याचच एक महत्वपूर्ण भाग शिक्षण, ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर,भूमीहीन नागरिकाचे मुलांना उच्च शिक्षणा साठी अडचणी येऊ नये या साठी ग्रामीण भागात ही महाविद्यालयांना मंजूरी मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थी विषेतः विद्यार्थींना राजेंद्र सिंह व्यास यांनी सोय करून दिली । आता या महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी या विद्या मंदीराचा लाभ घ्यावी, सोबतच पालकवर्गांनी सुद्धा आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे योग्य लक्ष देणे ही आवश्यक आहे।
या प्रसंगी संत गुलाब बाबा शिक्षण संस्थे चे अध्यक्ष विरेंद्र सिंह व्यास, कोंढाळी चे उपसरपंच स्वप्निलसिंह, संस्थेचे संचालक दुर्गाप्रसाद पांडे, प्रमिलासिंह चंदेल, दिलीप जाऊळकर, प्राचार्य हरिदास लाडके,डाक्टर राजू अंबाडकर,डा-लोमेश्वर घागरे, डा-राजू खरडे, डाक्टर गोपीचंद कठाणे, डा-महेंद्र सिंह राठोड, डाक्टर-प्रज्ञासा उपाध्याय, प्रो-विजय भोसे, विजय सिंह परिहार, महेश गोडबोले, गजानन दार्हेकर, रमेश पांडे, प्रेमराज परतेती, विनोद काकडे, तथा अनिल चव्हान यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य हरिदास लाडके, संचलन डाॅ-गोपीचंद कठाणे तर आभार डाॅ लोमेश्वर घागरे यांनी केले .