वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्याची गरज वन विभागाने वेळीच लक्ष देणे आवश्यक
कोंढाळी -वार्ताहर
वन्यप्राण्यांची भटकांती थांबावी यासाठी वन विभागाकडून ठिक ठिकाणी पाणवठे तयार करणे गरजेचे असते, त्या प्रमाणे काही मोज्याक्या ठिकाणी पाणवठे बांधतात ही। मात्र मागील तिन वर्षा पासून पाहिजे तसा पाऊस न झाल्याने पाणवठे ही कोरडेच पडले आहे।या मुळे वन्यप्राण्यांवर भटकांती ची वेळ आली आहे व वन्यजीव पाण्यासाठी मानवी वस्ती कडे धाव घेत आहे ।
नागपुर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी -मेटपांजरा क्षेत्र डोंगराळ भागात असून येथे जंगल क्षेत्र ही ब-यापैकीआहे.याभागामधे वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे।या मधे निलगाय(रोही)हरण,मोर, माकड, भालू,वाघोबा, बिबट असे अनेक प्रकार चे वन्य प्राणी व पक्षी या भागातील वनपरिक्षेत्रा आहेत। परंतु जंगलात पाणी उपलब्ध नसल्याने हे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्ती कडे धाव घेतात । यात गावकर्याचे जीवीतास धोका तर पोहचतच आहे शेतकर्यांचा जोड व्यवसाय व गो पालकांचे दुधारू जनावरांना वन्य प्राणी (बिबट वाघ) फस्त करत आहेत,यातून मानव व वन्यजीव यांचेत संघर्ष होऊ पाहत आहे। याचा फटका शेतकरी व गोपालकांन मोठ्या प्रमाणावर बसत आहे।
*जीवंत पाणवठ्याची गरज*
या भागातील अवर्षण मुळे तसेच मागील वर्षाच्या कोरोना संकट काळात पाणवठे भरण्यात आले नाही, करीता वन्यप्राण्यांवर भटकांती ची वेळ आली आहे, जंगलातील नाल्यांवर बांध घालून पाणवठे तयार केले तर मे जून प्रर्यंत पाणी संग्रहित राहू शकते असे मत कोंढाळी जि प सर्कल चे माजी जि प सदस्य रामदास मरकाम यांनी वन विभागाचे अधिकार्यांना सांगितले, तसेच मेटपांजरा जिला परिषद सर्कल चे जि प सदस्य सलील देशमुख यांनी सुद्धा याबाबद वन अधिकार्यांशी चर्चा केली असून जीवंत प्रवाह असणारे ओढ्याचे सर्वेक्षण करण्या बाबद ही चर्चा केल्याचे सांगण्यात आले आहे।
या प्रकरणी माजी जि प सदस्य रामदास मरकाम व स्थानिय वन्यप्रेमींनी काटोल चे उप विभागीय वन अधिकारी यांचे कडे मागणी केली असुन दिर्घकाळा पाणी साठा राहील अशी जागा ही दाखवली आहे ।