रेल्वे ने पडुन एका इसमाचा मृत्यु सालवा स्टेशन येथील घटना .

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत सालवा रेल्वे स्टेशन रेल्वे रूळावर गाडीतुन पडुन एका इसमाचा मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरुन पोलीस स्टेशन येथे मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .
पोलीस सुत्रानुसार प्राप्त माहिती नुसार गुरूवार (दि.१८) नोव्हेंबर ला दुपारी १:३० वाजता दरम्यान मृतक संजुकुमार सिंधु स्वाहीन वय ३३ वर्ष राह. नली हाडा हा सुरत वरून उडीसा येथे रेल्वेनी जात असतां ना कन्हान परिसरातील सालवा रेल्वे स्टेशन दरम्यान पोल नं. ११०३/१६ ते ११०३/१८ जवळ एक इसम रेल्वेतुन खाली पडला असुन त्याचा हातापायाला गिट्टी चा मार लागुन गंभीर जख्मी झाल्याने त्याचा घटना स्थळी मृत्यु झाला. ही माहिती रेल्वे चौकीदार यांनी कन्हान पोलीस स्टेशन ला दिली असता कन्हान पोली स स्टेशनचे पोलीस हवालदार नरेश वरखडे व शिपाई मंगेश सोनटक्के यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करून मृतकाला शवविच्छेदना करिता कामठी रुग्णा लयात पाठविले. सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसां नी फिर्यादी मोहनलाल प्रसादी लाल वय ८६ वर्ष राह. आरपीएफ आऊट पोस्ट कामठी एसीआई च्या तक्रारी वरून कन्हान पोलीस स्टेशन ला मर्ग क्र. ४४/२०२१ कलम १७४ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार नरेश वरखडे हे करीत आहे.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535