राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेसाठी नागपूर जिल्ह्याच्या आठ खेळाडुंची निवड
कन्हान : – नोखा, जिल्हा बिकानेर, राजस्थान येथे २९ ऑगस्ट ते ०१ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या ३४ व्या राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेकरिता नागपुरच्या आठ खेळाडुं ची निवड करण्यात आली.
महाराष्ट्रतील कोरोना परिस्थिती लक्षात घेता राज्य स्तरीय स्पर्धेला परवानगी न मिळाल्याने महाराष्ट्र टग ऑफ वाॅर असोसिएशन च्या वतीने महाराष्ट्र राज्य रस्सीखेच संघाची निवड चाचणी ऑनलाईन पद्धतीने दिनांक ०८ ऑगस्ट २०२१ रोज रविवार ला घेण्यात आली. यात नागपुर जिल्हा रस्सीखेच संघातील खेळा डुंनी उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे खालील आठ खेळाडुंची सिनियर राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धे करिता निवड करण्यात आली. यात खेळाडु खालील प्रमाणे
१) अमित राजेंद्र ठाकूर, २) क्षितिज रुपचंद सिरीया,
३) हर्षल हुकुमचंद बढेल,४) हेमंत मनोजसिंग चव्हाण
५) रुद्रांश मनोज मरघडे, ६) चिन्मय सुनिल भगत, ७) शिवम रमाकांत पिंपरोडे व ८) ईशांक सुशील तेलंग हे खेडाळु राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेत खेळणार असुन यात विशेष म्हणजे रूद्रांश मनोज मरघडे व हेंमत मनोज सिंग चव्हाण या दोन कन्हान च्या खेडाळुंचा समावेश आहे. दि टग ऑफ वाॅर असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल भाऊ केदार, टग ऑफ वाॅर फेडरेशन ऑफ इंडियाच्या महासचिव तथा महाराष्ट्र टग ऑफ वाॅर असोसिएशन च्या अध्यक्षा माधवी पाटील, महासचिव जनार्दन गुपिले, दि टग ऑफ वाॅर असोसिएशनचे उपाध्यक्ष लक्ष्मण राठोड, सचिव धैर्यशील सुटे, सहसचिव राज कुमार परीहार, आशिष उपासे, कोषाध्यक्ष बबलु सोन टक्के, ओमप्रकाश आकोटकर, नितेश घरडे आदी,तसेच डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपूर तर्फे राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडुंचे अभिनंदन करून पुढील वाटचाली च्या यशाकरिता शुभेच्छा दिल्या आहे.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535