राम मंदिर येथे मूर्तीची प्राण प्रतिष्ठा मंदिर जीर्णोद्धार बजरंगबली व शिव मंदिर मूर्ती स्थापणा महापौर दयाशंकर तिवारी यांची भेट
कोंढाळी : दुर्गाप्रसाद पांडे
येथील प्रसिद्ध प्राचीन राम मंदिर येथे बजरंगबली व शिव मंदिर मंदिर नूतनीकरण, मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कळस रोहन तीन दिवसीय कार्यक्रम आनंदात पार पडले निर्माण कार्यात भाविक ,श्री राजस्थानी समाज व गावातील अन्य भाविकांच्या सहकार्य लाभले.कार्यक्रमाला भाविकांनी हजेरी लावली तीन दिव्य परिसर भक्तिमय व प्रसन्नमय झाला होता. प्राण प्रतिष्ठाला खास ब्राहण आमंत्रित केले होते. विधिवत पूजन करण्यात आले. धान्य, भाजीफळे, व दुग्ध अभिषेक तीन दिवस करण्यात आला.
आरती व महाप्रसाद वितरणाने कार्यक्रम समाप्ती करण्यात आली., संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिसरातील राजस्थानी समाजाने सहकार्य लाभले, विशेषत: संध्याकाळच्या आरतीवेळी नागपूरचे महापौर श्री दयाशंकर तिवारीजींनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन श्री राम मंदिर देवस्थानला भेट दिली. आयोजकांची त्यांनी प्रश्नश केली.