रक्तदान करून जनावरांचे जीव वाचविता येते- डॉ स्वप्निल रेवतकर रक्त ट्रान्सफर करून गाईला दिले जीवनदान
Summary
कोंढाळी वार्ताहार रक्तदान श्रेष्ठ दान असे संबोधले जाते, या प्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या अपघातात किंवा शल्य चिकित्से प्रसंगी शरीरातील रक्त कमी झाल्यास व्यक्तीला रक्तगतनुसार रक्तदिल्या जाते त्यामुळे व्यक्तीचा प्राण वाचतो त्याच प्रमाणे कोंढाळी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ स्वप्नील रेवतकर ,डॉ मयूर […]

कोंढाळी वार्ताहार
रक्तदान श्रेष्ठ दान असे संबोधले जाते, या प्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या अपघातात किंवा शल्य चिकित्से प्रसंगी शरीरातील रक्त कमी झाल्यास व्यक्तीला रक्तगतनुसार रक्तदिल्या जाते त्यामुळे व्यक्तीचा प्राण वाचतो त्याच प्रमाणे कोंढाळी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ स्वप्नील रेवतकर ,डॉ मयूर काटे सुधीर सहकारी
सुधीर कापशिकर,यांनी मारणावस्थेला टेकलेल्या गाईला रक्त ट्रान्सफर करून तिला जीवनदान दिले.
प्राप्त माहितीनुसार कोंढाळी येथील शेतकरी व दुध उत्पादक गणेश घाटे यांच्या गाईला थायलेरिया रोगाचे संक्रमण झाले होते त्यामुळे रक्तपेशींची संख्या व रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन गाय मरनावस्थेत झाली होती त्यामुळे रक्त ट्रान्सफर हाच उपाय शुल्क असताना डॉ स्वप्नील रेवतकर यांनी गाईच्या रक्ताचे नमुने सहायक आयुक्त पशुसंवर्धन रोग विभाग अनवेषन प्रयोगशाळा येथे पाठविले असता थायलेरिया संकर्मन,व हिमोग्लोबिन प्रमाण कमी असल्याचे निदान झाले असता पशुवैद्यकीय अधिकारी काटोल डॉ मयूर काटे, डॉ स्वप्नील रेवतकर व कंपोउंडर सुधीर कापशिकर यांनी गाईला रक्त देण्याचे ठरविले लगेच मंगेश घाटे यांच्याच गोट्यातील साहिवाल जातीच्या गाईचे रक्त घेऊन गाईला दिले असता एका दिवसानंतर गाय बसलेल्या अवस्थेतून उभी झाली व सहा दिवसानंतर गाय आता चारापाणी करीत असून तिची प्रकृती ठीक असल्याचे शेतकरी यांनी सांगितले दुधाळू गाईचे प्राण वाचविण्यात पशुवंद्यकीय डॉक्टर चमू यांना यश आले असून आजपर्यंत नागपूर विभागात रक्त देऊन जनावर वाचविण्याची ही दुसरी केश असल्याचे डॉ स्वप्नील रेवतकर यांनी सांगितले.