येत्या दोन महिन्यात लाभार्थ्यांना पट्टे वाटप पूर्ण करा – उपमुख्यमंत्री शासकीय योजनांच्या अंमलबजाणीस गती देण्याचे आवाहन काटोल व नरखेड तालुक्याची आढावा बैठक
Summary
काटोल, प्रतिनिधी -दुर्गाप्रसाद पांडे केंद्र व राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनांतर्गत लाभार्थ्यांना हक्काची घरे प्राप्त होण्यासाठी येत्या दोन महिन्यात पट्टे वाटपाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रशासनाला दिल्या. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काटोल उपविभागीय […]
काटोल, प्रतिनिधी -दुर्गाप्रसाद पांडे
केंद्र व राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनांतर्गत लाभार्थ्यांना हक्काची घरे प्राप्त होण्यासाठी येत्या दोन महिन्यात पट्टे वाटपाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रशासनाला दिल्या.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काटोल उपविभागीय कार्यालयात आज नरखेड व काटोल तालुक्यातील उपविभागीय आढावा बैठक झाली .खासदार कृपाल तुमाने, आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख ,चंद्रशेखर बावनकुळे,आशिष जायस्वाल, टेकचंद सावरकर, चरणसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य व केंद्र शासनाच्या घरकुल योजनाअंतर्गत राज्यात दहा लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्दिष्ट पूर्तीसाठी पूरक ठरणारे पट्टे वाटप काटोल आणि नरखेड तालुका प्रशासनाने येत्या दोन महिन्यात पूर्ण करावे. या उद्दिष्ट्य पूर्तीच्या कार्यक्रमास स्वतः उपस्थित राहील.
आजच्या आढावा बैठकीत सादरीकरण करण्यात आलेल्या तालुक्यातील सर्व योजना येत्या काळात वेगाने पूर्ण करा. पालकमंत्री म्हणून या कामातील अडचणी दूर करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
सरासरीपेक्षा कमी पावसाची परिस्थिती लक्षात घेता. त्यात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, पीक नियोजन आणि पेरण्यांच्या तारखांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. ‘अटल भूजल योजना’ व जलयुक्त शिवार योजनेतील कामांना गती दिल्यास कमी पावसातही पिके जगवता येतील,असे त्यांनी सांगितले. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सौर पॅनल लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमीनीची गरज आहे. नापीक, पडीत जमिनीचा यासाठी उपयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना माहिती द्या, सौर पॅनलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मिती झाल्यास दिवसाच्या ओलीतासाठी वीजेचा अतिरिक्त साठा निर्माण होईल, यासाठी दोन्ही तालुक्यांमध्ये प्रभावी प्रचार यंत्रणा लाविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तत्पूर्वी, उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी सादरीकरण केले.यात त्यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रम, अतिवृष्टी नुकसान भरपाई, जलयुक्त शिवार,अमृत सरोवर, पीएमकिसान, जलजीवन अभियान, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, माझी वसुंधरा अभियान, पांदन रस्ता, रोजगार हमी योजना, सामाजिक अर्थ सहाय्यित योजना, गाव तिथे स्मशानभूमी, आपले सरकार सेवा केंद्र आदींची माहिती दिली.
आमदार अनिल देशमुख, आशिष जायस्वाल आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सूचना केल्या. आज बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना आणि सादरीकरणात झालेली चर्चा पूर्णतः अंमलबजावणीत आली पाहिजे याबाबतचे निर्देशही त्यांनी बैठकीच्या शेवटी केले.
काटोल ,नरखेड आणि मोहाड नगरपरिषदेच्या विविध कामांचा आढावाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला.
उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेपूर्वी काटोल येथील आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना अटक
१९/०५/२ काटोल पोलीस स्टेशन काटोलच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे हे उपस्थित राहणार होते. त्या सोबतच काटोल तहसील कार्यालय येथे अधिकाऱ्यांची आढावा बैठक व भाजपाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मा. फडणवीस साहेब यांना शेतकऱ्यांच्या दुरावस्थेबाबत व शेतकऱ्यांच्या समस्येबाबत प्रश्न विचारण्याचा कार्यक्रम आम आदमी पार्टी च्या वतीने ठरविण्यात आला होता याची माहिती पोलीस विभागाला कळताच आम आदमी पक्षाचे जिल्हा संघटन मंत्री सुनीलदादा वडस्कर व आम आदमी पार्टीचे युवा आघाडीचे नागपूर जिल्हा अध्यक्ष वृषभ वानखेडे यांना पोलिसांनी सापळा रचून मोठ्या सीताफिने अटक केली व त्यांना दिवसभर पोलीस स्टेशन काटोल येथे पोलिसांच्या निगराणी मध्ये नजर कैद करण्यात आले.
याबाबत जिल्हा संघटन मंत्री सुनील वडस्कर यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की सध्या स्थितीमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अतिषय दैनावस्था आहे. शेतकऱ्यांना अजून पर्यंत नुकसान भरपाई चे पैसे मिळालेले नाही. बँकांमध्ये सिबिल च्या नावाखाली शेतकऱ्यांना आर्थिक मदतीपासून वंचित ठेवण्यात येत आहे. अजून पर्यंत शेतकऱ्यांना पूर्णवेळ पूर्ण दाबाची वीज न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. काटोल मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची फौज निर्माण झाली असून राज्यकर्ते मात्र सत्तेसाठीचा लपंडाव खेळण्यात व्यस्त आहे.
अशावेळी संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणे हा सर्व सामान्यांचा अधिकार आहे असे असताना सुद्धा सत्तेचा दुरुपयोग करून व प्रशासनाची दमदाटी करून आपल्या अधिकारापासून प्रशासनाने जनतेला वंचित ठेवले याबद्दल पोलीस प्रशासनाच्या दमदाटीचा व राज्यकर्त्यांच्या मुजरखोरीचा आम आदमी पक्ष जाहीर निषेध करते आहे असे सुनील वडस्कर यांनी सांगितले याप्रसंगी पोलीस स्टेशनमध्ये सुनीलदादा वडस्कर, वृषभ वानखेडे, गणेश रेवतकर, शेखर खरपूरीया, मंगेश टेकाडे, दत्ताजी धवड, संजय उपासे, निलेश पेठे, केवल तुमडाम, आदीसह शेकडो कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली होती.
उष्णतेच्या उकाड्याने नेते-कार्यकर्ते-व अधिकारी बेहाल
उपमुख्यमंत्री काटोल येथील शासकीय व पक्षीय कार्यक्रमाला येत्या आधिच
शेतकर्यांचे मागणी करणारे आप पार्टीचे कार्यकर्त्यां ताब्यात घेतले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांना१४९च्या नोटीसा बजावल्या गेल्या होत्या अशि माहिती मिळाली असून या सरकारला शेतकर्यांचे सरकार म्हणावे काय?
तर आढावा बैठकिच्या नावाखाली घेतलेल्या बैठकी दरम्यान उष्णतेच्या उकाड्याने अधिकारी व सभा मंचावर आसनस्थ नेत्यांची उकाड्याने लाही लाही झाल्यावर सत्ताधारी राष्ट्रिय पक्षाचे काही आजी, माजी पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे समापन होण्या आधीच आढावा बैठकीतून काढता पाय घेतला.

