नागपुर

मानव-वन्यजीव संघर्ष कसा टाळावा या करिता जनजागृती वनविभागाकडून रात्रीची गस्त आणि जनजागृती

Summary

वार्ताहर- कोंढाळी -दुर्गा प्रसाद पांडे कोंढाळी वनपरिक्षेत्र नागपूर आणि वर्धा वनविभागाच्या सीमेलगत कोंढाळी वन परिक्षेत्र आहे. यात वर्धा वनविभागाच्या बोर अभयारण्यातील बफर झोन क्षेत्रात वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. बोर अभयारण्यातून लगतच्या लोकसंख्येच्या परिसरात हिंसक वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती […]

वार्ताहर- कोंढाळी -दुर्गा प्रसाद पांडे
कोंढाळी वनपरिक्षेत्र नागपूर आणि वर्धा वनविभागाच्या सीमेलगत कोंढाळी वन परिक्षेत्र आहे. यात वर्धा वनविभागाच्या बोर अभयारण्यातील बफर झोन क्षेत्रात वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. बोर अभयारण्यातून लगतच्या लोकसंख्येच्या परिसरात हिंसक वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण बनले आहे. या करिता
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक असताना, वन्यजीवांच्या उपयुक्ततेबाबतही जनजागृती आवश्यक आहे. जंगलात वन्यप्राण्यांना खाद्य कमी मिळत असल्याने तेही‌ वनक्षेत्रा बाहेर निघत आहेत. वन्यजीव प्रभावित भागात मुले आणि प्रौढ
, प्राण्यांना सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. या संदर्भात कोंढाळी वनपरिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते यांनी बफर झोन क्षेत्रातील खापा, धोतीवाडा, किनकीधोडा, कामठी, मासोद, जटलापूर, चिखली, खैरी, धामणगाव, खापरी, जामगड, जुनापाणी, हेटी, चिंचोली, साह कोंढाळी या वनपरिक्षेत्रालगतचे अन्य गावातील शेतकर्यांचे वर्षभरात ६० हून अधिक प्राण्यांना वाघ/बिबट्याने लक्ष्य केले
या घटनेमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.यासाठी कोंढाळी वन परिक्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते, उप वन अधिकारी एफ.बी.पठाण, वनरक्षक व वनमजुरांनी संबंधित गावात रात्रीची गस्त घालून. बफर झोन क्षेत्रासोबतच अन्य गावांत वन्य प्राणी व मानव संघर्ष टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याची माहिती शेतकरी व नागरिकांना देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *