महिलेची बॅग हिस्कावुन पळालेल्या आरोपीला गुन्हे शाखा पोलीसांनी पकडले कारवाई दरम्यान एकुण १,४१,५०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर – मनसर महामार्गावरील वराडा शिवारात बंद टोल नाका जवळ एका अनोळखी आरोपीने दुचाकीने मागून येऊन फिर्यादीच्या पत्नीची बॅग हिस्कावून पळालेल्या आरो पींचा कन्हान पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथक शोध घेत रामटेक पोलीसांच्या सहकार्या ने स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीण पथकाला पळु न गेलेल्या आरोपी आबीद खान हमीद खान यास पकडुन त्यांचे ताब्यातील एकुण १,४१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील तपासाकरिता कन्हान पोलीसांना सोपविण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, शुक्रवार (दि.२) जुलै २०२१ ला रात्री १०:३० ते १०:४० वाजता दरम्यान बबलु तुलाराम सोनकुसरे (वय ३२), रा. रामटेक हा नागपूर सासुरवाडी येथुन पत्नी व मुलीसह रामटेकला परत जात असतांना एका अनोळखी एव्हंचर मोटार सायकल काळ्या रंगाच्या दुचाकीवर बसुन काळ्या रंगाचा शर्ट घातलेला व लांब केस असलेल्या आरोपीने बबलु सोनकुसरे यांच्या अँक्टिवा दुचाकी गाडीच्या मागुन येऊन गाडीला लात मारून पत्नीच्या खांद्या वरील लेडीज बॅग हिसकावून पळुन गेला होता. बॅग मध्ये नगदी ८ हजार रुपये, दोन ग्राम सोन्याची मनी किंमत ९,७०० रुपये, चांदीचे पायल ३ हजार रुपये व एमआय कंपनीचा मोबाईल किंमत ८ हजार रुपये, असा एकूण २८,७०० रुपयाचे सामान, पैसे व कागद पत्रासह घेऊन पळुन गेला. सदर प्रकरणी बबलु सोन कुसरे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन कन्हान येथे अप क्र २३९/२१ आरोपी विरुद्ध कलम ३९२ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हया च्या तपासात स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पथक तसेच जिल्हातील पोलीस स्टेशन ला आरोपी बाबत माहिती देण्यात आली असता मंगळवार (दि.६) जुलै ला स्थानिक गुन्हे शाखा नागपुर पथकाला सदर आरोपी हा रामटेक परिसरात फिरत असल्याची माहि ती प्राप्त झाल्याने सदर माहिती पोस्टे रामटेक चे सहा. पोलीस निरीक्षक विवेक सोनवने यांना दिल्याने त्यांचे सहकारी परि. पोउपनि ओम कारगुलवार व इतरांनी सदर आरोपी आबीद ला रामटेक येथुन ताब्यात घेऊन गुन्हात वापरलेली दुचाकी किमत ७०,००० रू, रोख ३,५०० रुपये नगदी व एपल आय फोन मोबाईल संच ६७,००० असा एकुण १,४१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी ला कन्हान पोलीस स्टेशन पोली स च्या ताब्यात देण्यात आले. सदर कार्यवाही नागपुर ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, स्थानिक गुन्हे शाखा पो लीस निरीक्षक अनिल जिट्टावार, कन्हान पोलीस निरि क्षक अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक अनिल राऊत, सहा. फौजदार लक्ष्मीप्रसाद दुबे, पोहवा विनोद काळे, नापोशि शैलेश यादव, अरविं द भगत, सत्यशिल कोठारे, पोशि प्रणय बनाफर, विरेंद्र नरड, चालक सफौ साहेबराव बहाळे तसेच पोस्टे राम टेकचे सपोनि विवेक सोनवने, परि. पोउपनि ओम कारगुलवार व सहकारी आदीनी यशस्विरित्या पार पाडली.
नंदलाल यादव
कामठी तालुका प्रतिनिधी
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9850263593