बारावीचा निकाल आज लाखोटिया भुतडा कनिष्ठ महाविद्यालया चा९७%/ तालुक्यात कोंढाळी ची ला भु कनिष्ठ महाविद्यालय अव्वल विद्यार्थ्यांनी मारली बाजी कोंढाळी
वार्ताहर -दुर्गा प्रसाद पांडे
फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल 25 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. तसेच शिक्षण महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे निकाल उपलब्ध करून देण्यात आलाआहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेत कोंढाळी येथील लाखोटीया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयचे कला(१३०), वाणिज्य -(९१), विज्ञान -(१७१) शाखांचे
(३९२)विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यां पैकी, विज्ञान (१७०पास), वाणिज्य (९०पास),कला(११९पास) एकूण (३७९)विद्यार्थी उत्तीर्ण झाले, यात कनिष्ठ महाविद्यालयाचा९७%.
निकाल आला.
यात विज्ञान शाखा- सार्थक अनिल चोपडे-८४.१७%यश रामदास नानोटकर७७.८३%
सम्यक सचिन उमाठे-७७.६७%वाणिज्य–अनिकेत कांतेश्वर खवशी७९.५० %
आर्य सुभाष बांगरे७८.१७% निखिल संजय चोपडे७७% कला शाखा – शिवानी बंडु चव्हान७८.६७%मोनिका गुरूचंद वानखेडे ७८% प्रणाली भोजराज सुर्यवंशी ६७.८३%-
विद्यार्थींनी गुणांक प्राप्त केले.
लाखोटिया भुतडा कनिष्ठ महाविद्यालय/ हायस्कूल चे संचालक मंडळ अध्यक्ष राजेश राठी, सचिव डॉ.शामसुंदर लद्दड, उपाध्यक्ष रेखा राठी, कोषाध्यक्ष मधुसूदन राठी, संचालक राहूल लद्धड, यांनी गुणगौरव केले तर याप्रसंगी आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी प्राचार्य गणेशराव सेंबेकर, वरिष्ठ पर्यवेक्षक सुधीर बुटे, कैलास थुल यांचे उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन सुनील सोलव यांनी तर आभार प्रदर्शन प्रिया धारपुरे – यांनी केले.
यावेळी लखोटिया भुतडा हायस्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
तसेच नजीकच्या कचरी सावंगा येथील आदर्श हायस्कूल/कनिष्ठ महाविद्यालयाचा ९५.४५% आणि एड-शामकांत कडू हायस्कूल/कनिष्ठ महाविद्यालय मासोद७४ %, चा निकाल लागला.