प्रेमी व नाबालिक प्रेमिका नी मुलाच्या घरी किटनाशक औषध पिऊन आत्महत्या
नागपूर कन्हान : – पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत डुमरी कला गावी एक प्रेमी व नाबालिक प्रेमिकाने लग्नास कमी वयाच्या अडथळयाने निराश होऊन प्रेमी मुला च्या राहते घरी किटनाशक औषध पिऊन आत्महत्या केली .
प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि.५) जुलै २०२१ ला सकाळी १० ते ०२ वाजता दरम्यान प्रेमी मुलगा साहेन रूपचंद देवढगळे वय २६ वर्ष राह. डुमरी कला व प्रेमिका नाबालिक कुमारी अंजली रमेश चौधरी वय १४ वर्ष राह. डुमली कला हे एकमेकांवर प्रेम करीत होते. त्यांना एकमेकांशी लग्न करायचे होते. परंतु लग्नास कमी वयाचा अडथळयाने मुलीचे वय पुर्ण होत पर्यंत थांबावे लागेल. यास्तव घरच्यांनी विरोध केल्या मुळे त्यांनी निराश होऊन मनावर परिणाम घेऊन प्रेमी मुलाच्या राहते घरी दोघांनी शेतात फवारणी करण्याचे किटकनाशक औषध प्राशन केल्याने अंजली चौधरी हिला उपचारार्थ रामटेक येथील सरकारी रुग्णालयात भर्ती केले असता अंजली चा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. तर प्रेमी सोहन देवढगळे या मुलाचा नागपुर ला मेडीकल कॉलेज येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाला. या दोन्ही प्रेमी युगलांनी फवारणी औषध पिऊन आत्मह त्या केल्याची माहीती पारशिवनी पोलीसांनी माहीती मिळताच घटनास्थळ डुमरी कला येथे पोहचुन पारशि वनी पोलीस निरिक्षक संतोष वैरागडे यांचे मार्गदर्शनात पोलिस उप निरिक्षक संदिपान उबाळे हे पुढील तापास करित आहें.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज
9579998535