पारडसिंगा येथे संत दर्शन सोहळयाला हजारो भाविकांची हजेरी श्री संत अंबादास महाराज ८१ वी जन्मोत्सवाचे भव्य आयोजन विदर्भ व परप्रांतातून भक्तांचे आगमन
काटोल-कोंढाळी-
प्रतिनिधी- दुर्गा प्रसाद पांडे
श्री क्षेत्र पारडसिंगा येथे श्री संत अंबादास महाराज यांचे ८१ वी जयंती वर्ष निमित्य विविध संतांचे दर्शन व अमृतवाणी सोहळ्याचे भव्य आयोजन वटपौर्णिमेला उत्सहात पार पडले. सोहळ्याला राज्य व राज्याबाहेरून हजारो भाविकांनी हजेरी लावली. संत रोहितबाबा पुसदा यांचे दर्शनाचा भक्तांनी लाभ घेतला.कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत पोतदार संत भानुदास महाराज संस्थान वर्धामनेरी,अतिथी प्रभाकर देशमुखश्रीक्षेत्र कान्होली, अभिजीतजी बोके श्रीक्षेत्र वरखेड,कृष्णाजी गिरीधर आर्वी,बापूसाहेब देशमुख नागरवाडी, अशोकराव पावडे श्रीक्षेत्र टाकळखेडा,गिरीश इटकेलवार भरवाडी,मनीष नायक उधोजक नवसारी गुजरात,सचिनदादा वानखेडे अमरावती, सुधीर बुटे कोंढाळी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराजांचे पाद्य पूजन संयोजक अवि राऊत अध्यक्ष,श्री संत लहानुजी महाराज संस्थान, रिधोरा यांनी केले, विविध भक्तांकडून शाल व श्रीफळ भेट वस्तू देऊन महाराजांना देण्यात आल्या. त्यानंतर महाराजांचा आयोजकांनी गोड तुला केला. याप्रसंगी हभप श्याम महाराज चौबे चांदुरबाजार यांचे गोपाल काल्याचे किर्तनाने सांगता करण्यात आली.आयोजन श्री संत लहानुजी महाराज संस्थान, रिधोरा, श्री संत लहानुजी महाराज उत्सव सेवा समिती, नागपूर जिल्हा श्री संत गजानन महाराज महापारायण समिती, काटोल तालुका यांचे संयुक्तपणे केले होते. यशस्वी आयोजनाबद्दल संयोजक अवि राऊत यांचा सत्कार गजानन बाग संस्थान पारडसिंगा व श्री विठ्ठल रुख्मिणी संस्थान यांचे वतीने सुधीर बुटे, विष्णू महाराज वडे, दिलीप वरोकर,रमेश गिरडकर आदींनी केला.याप्रसंगी सर्व उपस्थित मंडळींची महाप्रसाद व्यवस्था संत लहानुजी महाराज संस्थान टाकळखेडा यांचे वतीने करण्यात आली होती. तसेच शरबत सेवा युधिष्ठार मेहतानी दिल्ली त्यांचे भगिनी, तसेच मोहिनी महाराज पारडसिंगा यांचे वतीने करण्यात आली होती.
संचलन राजेश गवळी मोझरी,आभार सौ भावना खेरडे तर सहाय्य छोटू वानखडे,निलेश बोके यांचेसह अनेक सहकारी मंडळींचे लाभले.
——-
———-