पाणी निकासी चार सिमेंट क्रॉक्रेट पायल्या चोरी.
नागपूर कन्हान : – शहरातील गहुहिवरा रेल्वे फाटक च्या बाजुला यंशवंत नगर, ओम यादव यांच्या शेतीच्या बाजुला नाल्याचे पाणी निकासी करिता एका वर्षा पासुन ठेवलेल्या चार सिमेट पायल्या गैरअर्जदार प्रभाकर नाटकर यांनी चोरुन नेल्याने अशोक भदुजी पाटील यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान व कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना एक लेखी तक्रार करून प्रकरणाची योग्य चौक शी करून गैरअर्जदारावर कायदेशीर कारवाई करून न्याय देण्याची मागणी केली आहे.
रविवार (दि.२७) जुन २०२१ ला सकाळी ८ वाजता च्या सुमारास गैरअर्जदार प्रभाकर दौलत नाट कर यांनी गहुहिवरा रेल्वे फाटक च्या बाजुला यंशवंत नगर, ओम यादव यांच्या शेतीच्या बाजुला नाल्याचे पाणी निकासी करिता एका वर्षा पासुन ठेवलेल्या ७०० व्यासाच्या चार पायल्या अर्जदार अशोक भदुजी पाटील यांना सुचना न देता कोलमाईन्सची नवीन जेसीबी आणुन जेसीबी च्या सहाय्याने चार पायल्या आपल्या प्रगती नगर चौकातच घरासमोर चोरुन नेऊन टाकल्या असुन पायल्याची एकुण किंमत ५५ हजार रुपये आहे. यामुळे अर्जदाराचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच गणेश नगर बौद्धबिहारा पासुन ३०० व्यासाच्या तीन पायल्या चोरीला गेल्या असुन त्या सुद्धा पायल्या गैरअर्जदारानेच नेल्याची शंका अशोक पाटील यांनी व्यकत करित त्यांनी कन्हान पोलीस स्टे शन ला तक्रार देण्यास गेले असता तक्रार न घेतल्याने वरिष्ठ अधिकारी यांना फोनवर माहीती देऊन कामठी उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान व कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांना एक लेखी तक्रार देऊन या प्रकरणाची चौकशी करून गैरअर्जदार प्रभाकर दौलत नाटकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून योग्य कायदेशीर कारवाई करून न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.