निशुल्क शारीरीक आरोग्य तपसणी शिबीराचा लोकांनी घेतला लाभ

नागपूर कन्हान : – ग्रामिण पत्रकार संघ कन्हान व्दारे आयु ष्मान आरोग्य भारत मंत्रालय प्रमाणित असलेल्या आयुर्वेदीक उपचार चिकित्सक कंपनीच्या सहकार्याने कन्हान ला आयोजित शारिरीक आरोग्य तपासणी शिबीरांत ५० नागरिकांनी घेतला लाभ.
रविवार (दि.२७) जुन २०२१ ला दुपारी १२ ते ५ वाजे पर्यंत ग्रामिण पत्रकार संघ कार्यालय, रेंघे पाटील भवन तारसा रोड शिवनगर कन्हान येथे निशुल्क शारि रीक आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले. शिबीरात संपुर्ण शरीरांची तपासणी करून शरी रांच्या अवयावयाचे आणि समोर उदभणा-या आजारा संबधित तज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. निशुल्क संपुर्ण शारीरीक आरोग्य तपासणी शिबीरात कन्हान परिसरातील ५० नागरिकांनी उपस़्थित राहुन लाभ घेतला. याप्रसंगी डॉ राजेश ठाकरे जिल्हाध्यक्ष भाजपा ग्रामविकास आघाडी, एन एस मालविये जेष्ठ पत्रकार, शांताराम जळते राज्य उपाध्यक्ष डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद महाराष्ट्र, दिलीप राईकवार, चंद्रकुमार चौकसे, सुनिल लाडेकर, प्रशांत मसार, प्रविण गोडे सह मान्यवरांनी भेट दिली. शिबीरात आयुष्मान आरोग्य भारत मंत्रालय प्रमाणित असलेल्या आयुर्वेदीक उपचार चिकित्सक कंपनीचे अमन पठान, पियुष माटे, राजेश बनीक, फारीन शेख, शमीस्ता शेख, नमीता मेश्राम, ऐश्वर्या पराते हयानी मौलाची कामगिरी बजावली. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता ग्रामिण पत्रकार संघ नागपुर जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, कन्हान अध्यक्ष रमेश गोळघाटे, कार्या़ध्यक्ष अजय त्रिवेदी, सचिव सुनिल सरोदे, कमलसिंग यादव, रविंद्र कोचे, गणेश खोब्रागडे, रविंद्र दुपारे, ऋृषभ बावनकर, रोहीत मानवटकर आदीने सहकार्य केले.