नागपूर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यास ग्रा पं ने तात्काळ कार्यवाही पूर्ण करण्यास आदेशीत करा विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाची मागणी. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री फुटाणे व जि प अध्यक्षा सौ बर्वे यांना निवेदन सादर.
कन्हान : – कोविड मुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्य़ातील शाळा व महाविद्यालये तातडीने सुरू करावी, या संदर्भातील आवश्यक कार्यवाही ग्राम पंचायतने तातडीने पूर्ण करण्यासाठी ग्राम पंचायतला आदेशीत करावे, अशी मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघा तर्फे शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वात उपमुख्य कार्यका री अधिकारी श्री कमलकिशोर फुटाणे व जिल्हा परिष द अध्यक्षा सौ रश्मीताई बर्वे यांना दिलेल्या निवेदनातु न करण्यात आली.
विदर्भात २८ जून पासून २०२१ – २२ चे नवे शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. मात्र कोविड च्या अना मिक धोक्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मा गील शैक्षणिक सत्रात (२०२०-२१) कोविड च्या प्रादु र्भावामुळे प्रत्यक्ष अध्यापना अभावी आभासी पध्दतीने शैक्षणिक सोपस्कार पार पडले. मात्र या ऑनलाईन पध्दतीत अनेक अडचणी आल्यामुळे अनेक मुलांपर्यंत (विशेषतः ग्रामीण भाग) प्रत्यक्ष अध्यापन कार्य पोहचु शकले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या मुळ प्रवाहापासून दुर राहिले. या नवीन शैक्षणिक वर्षांत नागपूर जिल्ह्य़ात कोविड आजाराचा जोर ओसरला आहे. अनेक गावे कोरोना मुक्त झाली आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने तसेच विद्यार्थ्यांकडे मोबा ईलचा अभाव, डाटा प्राब्लेम, कनेक्टिव्हिटीची समस्या या सर्व बाबींमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका बळावला आहे. या बिकट परिस्थिती त विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता कोविड च्या संदर्भाती ल मार्गदर्शक तत्त्वे पाळून नागपूर जिल्ह्य़ातील शाळा, महाविद्यालये शासनाच्या कोविड एसओपी मार्गदर्शक तत्त्वे पाळुन शाळा, महाविद्यालये तातडीने सुरू करा वी. संबंधित ग्राम पंचायतने शाळांना ना हरकत प्रमाण पत्र देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करा वी, ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी ग्राम पं चायतला आदेशीत करावे अशी मागणी विदर्भ प्राथमि क शिक्षक संघ नागपुर विभाग नागपुर (प्राथमिक, मा ध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ) तर्फे शिक्षक नेते व प्राचार्य श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वात ना गपूर विभागीय सचिव खिमेश बढिये, माध्यमिक संघ टक सौ नंदा भोयर, शाळाबाह्य शोध समितीचे सदस्य तथा पारशिवनी तालुका संघटक भिमराव शिंदेमेश्राम, जिल्हा ग्रामीण संघटक गणेश खोब्रागडे, शाळाबाह्य शोध समितीचे सावनेर तालुका संघटक संजय भोयर
यांनी केली आहे. यासंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री कमलकिशोर फुटाणे व जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रश्मीताई बर्वे यांना निवेदन सादर करून या विषयावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्या त आली आहे.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535