नागपुर-जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर भाजपा पदाधिका-यानी केले चक्काजाम आंदोलन भाजपा रामटेक विधानसभा पदाधिका-यांचे पोलीस प्रशासना मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.
कन्हान : – ओबीसी आरक्षण स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुका मधील सुप्रिम कोर्टाने आरक्षण रद्द केल्या चा निर्णय केल्याने महाराष्ट्र सरकारने सेवानिवृत्त न्यायाधींश समिती नेमणुक तसेच सुप्रिम कोर्टात फेर विचार याचिका दाखल करावी या करिता भाजपा रामटेक विधानसभा क्षेत्राच्या पदाधिका-यांनी नागपुर – जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील आमडी येथे चक्का जाम आंदोलन करून राज्य शासनाच्या विरोधात जोर दार प्रदर्शन करित पोलीस प्रशासना मार्फत मुख्यमंत्री ला निवेदन पाठवुन ओबीसी आरक्षण लागु करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ओबीसी समाजाचा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याचा निर्णय दिला आहे त्यामुळे ओबीसी समाजा तील बंधु व भगीनीवर स्थानिक स्वराज्य संस्था निवड णुक मध्ये ओबीसी आरक्षण मधुन निवडणुक लढवता येणार नाही. त्यामुळे फारच मोठा अन्याय झाला आहे. महाराष्ट्र सरकारने लवकरच सुप्रिम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करावी. तसेच सेवानिवृत्त न्यायाधिं शाची समिती नेमणुक करण्यात यावी आणि ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्याय त्वरीत दुर करण्या च्या मागणी करिता शनिवार (दि.२६) जुन ला भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री चंन्द्रकांत दादा पाटील, सर चिटणीस चंन्द्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार संपुर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचे आयोजनाने रामटेक विधानसभा क्षेत्र भाजपा पदाधि का-यांनी माजी आमदार श्री मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वात नागपुर- जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वरील आमडी येथे चक्काजाम आंदोलन करून महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार प्रदर्शन करित पोलीस प्रशासना मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवुन तात्काळ ओबीसी ला आरक्षण लागु करण्या ची मागणी केली आहे. या आंदोलनात भाजपा पदाधि कारी कमलाकर मेंघर, रामभाऊ दिवटे, शरद सहारे, राजेश ठाकरे, परसराम राऊत,राजेश कडु, राजु भोयर , व्यंकटेश कारेमोरे, अशरदभाई शेख, संजय मुलमुले, अतुल हजारे, नरेश पोटभरे, जयराम मेहरकुळे, पुरूषो त्तम खेरगडे, सुभाष बावनकुळे, देविदास दिवटे, डॉ मनोहर पाठक, कामेश्वर शर्मा, सुनील लाडेकर, नरेंन्द्र बन्नाटे, अमोल साकोरे, दिलीप देशमुख, आलोक मान कर, रितेश बावने, सतीश डोंगरे, धर्मेंन्द्र शुक्ला, धर्मेंद्र गणवीर, अनिता भड, डॉ माधुरी बावनकुळे, लता कांब ळे, गमगाताई, पेटवार ताई, सुषमा चोपकर, तुलेशा नाटवटकर, शालीनी बर्वे, संजय देशमुगरे, प्रविण माना पुरे, राजेश जैस्वाल, लीलाधर बर्वे, नंदकिशोर कोहळे, सौरभ पोटभरे, ऋषभ बावनकर, रोहित चकोले, सचि न कांबळे, मयुर माटे, संजय रंगारी, अलदीराम कनो जिया, अमन घोडेस्वार, भरत सावळे, सचिन वासनिक सह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.