नागपुर

धर्मराज शाळेत राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण

Summary

कन्हान : – शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय नवी दिल्ली यांचे मार्फत संपूर्ण देशभरात शुक्रवारी (दि.१२) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती मधील संपादणूकीचे मूल्यांकन करणे व देशाच्या शिक्षण प्रक्रि येच्या आरोग्याचे […]

कन्हान : – शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय नवी दिल्ली यांचे मार्फत संपूर्ण देशभरात शुक्रवारी (दि.१२) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
हे सर्वेक्षण विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती मधील संपादणूकीचे मूल्यांकन करणे व देशाच्या शिक्षण प्रक्रि येच्या आरोग्याचे मूल्यांकन करणेसाठी एकाच दिवशी संपूर्ण देशात हे सर्वेक्षण होत आहे. प्रस्तुत सर्वेक्षणा साठी महाराष्ट्र राज्यातील इयत्ता ३ री, ५वी, ८वी व १० वी चे एकुण ७३३० शाळा व २,३४,०५५ विद्यार्थ्या यां ची निवड केंद्र शासनामार्फत करण्यात आली आहे. या सर्वेक्षण अंतर्गत धर्मराज प्राथमिक शाळेत व विद्याल यात इयत्ता तिसरी, आठवी व दहावी च्या प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांची निवड करून परीक्षा घेण्यात आली. या वेळी तिसरीसाठी क्षेत्रीय निरीक्षक सौ माधुरी खोडे, क्षेत्रीय अन्वेषक सौ वैशाली सावरकर,सौ सुनंदा भगत यांनी तर आठवी दहावीसाठी जयश्री कानतोडे, ज्योती अंबादे, निलेश मुळे यांनी परीक्षक म्हणून कार्य केले. पारशिवनी तालुक्यात सदर सर्वेक्षण कार्य गटशिक्षणा धिकारी कैलास लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. मुख्याध्यापिक पमिता वासनिक, मुख्याध्यापिक आशा हटवार, उपमुख्याध्यापक रमेश साखरकर, चित्र लेखा धानफोले, खिमेश बढिये, भिमराव शिंदेमेश्राम, हरिष केवटे, उदय भस्मे, राजु भस्मे, अमित मेंघरे, लिखिता धांडे, किशोर जिभकाटे, अनिल सार्वे, अपर्णा बावणकुळे, शारदा समरीत, प्रिती सेंगर, हर्षकला चौधरी व शिक्षक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

राहुल भोयर
नागपुर शहर प्रतिनिधी
9975409640
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *