धर्मराज विद्यालय कांद्री येथे राष्ट्रीय संपादणुक सर्व्हेक्षण संदर्भात पालक सभा संपन्न
कन्हान : – तालुक्यातील कांद्री येथील धर्मराज प्राथमिक शाळेच्या वर्ग ३ री च्या पालकांची NAS राष्ट्रीय संपादणुक सर्व्हेक्षण संदर्भात पालक सभा आज (ता ८) रोजी संपन्न झाली.
या पालक सभेत शिक्षक श्री खिमेश बढिये यांनी NAS राष्ट्रीय संपादणुक सर्व्हेक्षण संदर्भातील माहिती पालकांना देऊन १२ नोव्हेंबर शुक्रवारी रोजी होणाऱ्या सर्वेक्षण चाचणीला १००% विद्यार्थी उपस्थित ठेवण्या चे आवाहन केले. तर या चाचणीला पालकांनी संपुर्ण सहकार्य करण्याचे आवाहन धर्मराज प्रायमरी शाळे च्या मुख्याध्यापिका सौ आशा हटवार यांनी केले. पालक सभेचे संचालन शिक्षक श्री भिमराव शिंदेमेश्राम यांनी तर आभार श्री राजु भस्मे यांनी व्यकत केले. यावेळी सौ चित्रलेखा धानफोले मैडम, कु. पुजा चरडे मैडम व पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

संजय निंबाळकर
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535
बातमी व जाहिरातीसाठी सम्पर्क करा
