देवी विसर्जनास गेलेला युवक कन्हान नदीत वाहुन गेला विजापुर (खंडाळा) कन्हान नदी घाटावरील घटना.
कन्हान : – नागेश्वर नगर बिडगाव येथील नवदुर्गा देवी मुर्तीचे विसर्जन करण्यास बॉयपास चारपदरी नविन पुलाच्या बाजुला कन्हान नदीच्या विजापुर (खंडाळा) घाटात आलेल्या दोन मंडळा पैकी एका मंडळातील राजेश भिमटे हा युवक नदी पात्रात बुडुन वाहुन गेला. पोलीसानी कामठीचे गोताखोर बोलावुन युवकांचा शोध घेत आहे.
शनिवार (दि.१६) ऑक्टोबंर ला दुपारी २ वाजता दरम्यान नागेश्वर नगर बिडगाव (पारडी) येथील दोन सार्वजनिक नवदुर्गा मंडळाने नागपुर बॉयपास चारपद री महामार्गावरील नविन पुलाच्या बाजुला कन्हान नदी च्या विजापुर (खंडाळा) घाटाच्या नदी पात्रात देवी मुर्तीचे विसर्जन केल्यावर दोन मुले पाण्यात बुडत अस ल्याचे दिसल्याने दोन लोकांनी वाचविण्याचा पर्यंत केला असता एका ला वाचविले परंतु पाण्याला जास्त प्रवाह असल्याने मोहीत राजेश भिमटे वय १९ वर्ष राह. नागेश्वर नगर बिडगाव (पारडी) यास वाचवु शक ले नाही. तो नदी पात्रात बुडुन काही दुर वाहत जाताना दिसला नंतर तो दिशेनाशा झाल्याचे तेथील नागरिकां नी सांगितले. घटनेची माहीती पोलीसाना दिल्याने कन्हान पोलीस पोहचुन कामठी पोलीसांना बोलाविले. अग्निशमन गाडी व कामठी ढिवर समाजाचे गोताखोर बोलावुन ४.३० वाजता कन्हान नदी पात्रात मोहीत भिमटे शोधण्याचे कार्य सुरू केले. घटनास्थळी प स कामठी माजी उपसभापती आशिष मल्लेवार व जि प सदस्या अंवतिका लेकुरवाळे स्वत: पोहचले असुन बातमी लिहे पर्यंत मोहीत चा शोध काही लागला नव्हता.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
पोलिस योद्धा न्यूज चॅनल
9579998535