नागपुर

डॉ शारदा रोशनखेडे यांची नागपूर ग्रीन सिटी रोटरी क्लब अध्यक्षपदी निवड व सचिवपदी डॉ जयदीप दास

Summary

नागपूर : दि. ९ जुलै. रोटरी क्लब नागपूर ग्रीन सिटी चा पदग्रहण सोहळ्यात अध्यक्षपदी डॉ. शारदा रोशनखेडे तर डॉ.जयदीप दास सचिवपदी…… आभासी आंतरजाला द्वारा तसेच शारीरिक उपस्थिती द्वारे ६ जुलै रोजी रोटरी क्लब नागपूर ग्रीन सिटी चा नुकताच झालेला पदग्रहण […]

नागपूर : दि. ९ जुलै.
रोटरी क्लब नागपूर ग्रीन सिटी चा पदग्रहण सोहळ्यात अध्यक्षपदी डॉ. शारदा रोशनखेडे तर डॉ.जयदीप दास सचिवपदी……

आभासी आंतरजाला द्वारा तसेच शारीरिक उपस्थिती द्वारे ६ जुलै रोजी रोटरी क्लब नागपूर ग्रीन सिटी चा नुकताच झालेला पदग्रहण सोहळा समारंभ कार्यक्रमात अध्यक्ष डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रमेश मेहरे व सहाय्यक गव्हर्नर मंजुषा चकनलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. तेजस्विनी हायस्कूल कोराडी च्या डॉ.शारदा रोशनखेडे शिक्षणतज्ञ व आदर्श शिक्षिका महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त यांची नव्याने अध्यक्षपदी निवड तर सचिवपदी डॉ.जयदीप दास यांची निवड करण्यात आली. डॉ.जयदीप दास हे निसर्ग आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रात सक्रिय आहे.
यापुर्वी शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक आणि पर्यावरण या क्षेत्रातील अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प आखले असून यापूर्वी विविध ठिकाणी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. रोटरी क्लब नागपुर ग्रीन सिटी एक अग्रगण्य क्लब आहे. 2021 -2022 च्या सदस्यांची नवीन कार्यकारिणी स्थापित करून मानवजातीसाठी आणि समाजासाठी नूतनीकरणाची जोरदार सेवा देण्याच्या उद्देशाने जोरदार सुरुवात करणार आहे. 25 वर्ष पूर्ण झाली असल्याने रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला असून पदग्रहण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. याप्रसंगी नवीन सदस्यांची नोंदणी करण्यात आली त्या मध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे शिक्षणासाठी (प्राथमिक, माध्यमिक) चिंतामण वंजारी ज्यांच्या अधिपत्याखाली वर्ग 1ली ते 12 वी चे अंदाजे 10 लाख विद्यार्थी आहेत तसेच मोहित रोशनखेडे, सुरेखा निंबाळकर, प्रभू कुल्लूरकर, वैशाली चंदेल, राजेश माखे, अतुल जिचकार तसेच ग्रीन सिटी बोर्डाचे सदस्य अशोक चांडक, वर्षा पानबुडे, राजेश निखारे, रूपेश सेमारे, उल्हास आठले, मनीषा चौधरी, चैत्र सालंकर दिग्दर्शक पद्मा देठे, डॉ. चंद्रशेखरन चाम, अक्षय भटकुलकर, दिनेश डांगरा, प्रवीण मेश्राम, रवी मिश्रा, विठ्ठल मांगले, लेखराम पटेल, केतकी सालंकर, डॉ. संजय वानकर, सुधीर घिके, राजेश व्यवहारे, ज्योत्स्ना पाटील, बंटी कोहळे, स्वाती धर्माधिकारी. डॉ. प्रशांत निखाडे, डॉ. संजय अंबटकर, अरुण चौधरी, विवेक देशपांडे, राजू गोवर्धन, नंदिनी सहस्त्रबुधे, विलास देशमुख, राजू पानबुडे, योगेश मेटांगळे हे क्लबचे सल्लागार असून यावेळी उपस्थित होते.

संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *