डुमरी रेल्वे कोळसा यार्ड येथे सीसीटीव्ही चे काम करताना वेकोलि कर्मचरी अजय भुसारी चा मृत्यु

कन्हान : – वेकोलि डुमरी रेल्वे कोळसा यार्ड येथील आऊटर चेक पोस्ट च्या छतावर सीसीटीव्ही कँमरे ची दुरुस्ती करताना तोल जाऊन खाली ट्रक च्या स्टेपनी टायर च्या नट बोल्ट वर पडुन गंभीर जख्मी होऊन उपचाराला नेताना रस्त्यात वेकोलि कर्मचारी अजय भुसारी यांचा मुत्यु झाल्याने कन्हान पोस्टे ला मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
शुक्रवार (दि.१) ऑक्टोबर ला वेकोलि च्या डुमरी रेल्वे कोळसा यार्ड परिसरात शुक्रवारी दुपारी साईटींग आऊटर चेक पोस्टच्या छतावर लागलेल्या सीसीटीव्ही कँमरे ची दुरुस्ती करताना वेकोलि कर्मचारी अजय कवडु भुसारी वय ३६ वर्ष राह. उमरेड हा दुरूस्तीचे काम करते वेळी अचानक तोल सुटला आणि उभ्या असलेल्या ट्रक क्र. एम एच ४० एन ७८४५ च्या स्टेफ नी टायर चे नट बोल्ट वर पडुन गंभीर दुखापत झाल्या ने तातडीने उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच अजय भुसारी याचा मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळ ताच वेकोलिचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी डुमरी रेल्वे कोळसा यार्ड सायडिगं ला पोहचुन पोलीसानी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे पाठविण्यात आले. कन्हान पोलीस स्टेशनचे बीट जमादार नरेश वरखडे हयानी जाफॉ १७४ नुसार मर्ग दाखल करून पुढील तपास करित आहे. तसेच वेकोलि कमेटी सुध्दा तपास करित आहे.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535